Orange Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Disease: संत्रापट्ट्यातील बागांना ग्रासले फायटोप्थोराने

Phytophthora in Citrus: संत्रापट्ट्यात फायटोप्थोरा रोगाचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्या कारणामुळे उत्पादकता प्रभावीत होण्याची भीती वर्तविली जात असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: संत्रा उत्पादकांच्या मागील शुक्‍लकाष्ठ संपता संपत नसल्याचे चित्र आहे. यंदा पोषक वातावरणाच्या परिणामी आंबिया बहराचा हंगाम समाधानकारक राहण्याची अपेक्षा होती. मात्र संत्रापट्ट्यात फायटोप्थोरा रोगाचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्या कारणामुळे उत्पादकता प्रभावीत होण्याची भीती वर्तविली जात असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड क्षेत्र असून त्यापैकी सर्वाधिक एक लाख हेक्‍टर क्षेत्र हे एकट्या अमरावती जिल्ह्यात आहे. २५ हजार हेक्टर उर्वरित महाराष्ट्रात तर २५ हजार हेक्‍टर नागपूर जिल्ह्यात लागवड आहे. अशाप्रकारे संत्रा लागवड क्षेत्राचे वर्गीकरण केले जाते. विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाची वानवा होता. त्यामुळे एकूण दहा लाख टन उत्पादनापैकी २५ ते ३० टक्‍के मिळणाऱ्या लहान आकाराच्या संत्रा फळांचे काय करायचे, हा प्रश्‍न दरवर्षी गंभीर होत होता.

त्यामुळे प्रक्रिया उद्योगाची मागणी सातत्याने होत होती. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरच्या मिहान परिसरात पतंजलीच्या फूडपार्कची उभारणी झाली. या ठिकाणी लहान आकाराच्या संत्रा फळांवर प्रक्रिया होणार असल्याने आता अशी सत्रा फळे न फेकता त्यातूनही परतावा मिळणार आहे. ही समाधानाची बाब असतानाच संत्रापट्ट्यात यंदा फायटोप्थोराचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

फायटोप्थोरा प्रादुर्भावग्रस्त बागांमध्ये झाडाचा अन्नद्रव्याचा पुरवठा प्रभावीत होतो. त्यामुळे झाड वाळते व ते उत्पादनक्षम राहत नाही. चांदूरबाजारसह जिल्ह्याच्या विविध भागात ही समस्या गंभीर झाली आहे. सुमारे ४० टक्‍के बागा फायटोप्थोराच्या परिणामी बाधित झाल्याचा दावा त्या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्याचा परिणाम आंबिया बहारातील फळांच्या उत्पादकतेवर होणार आहे. त्यामुळे यंदाच्या आंबिया बहराच्या हंगामात फळांची उपलब्धता कमी राहील त्यातून बाजारपेठ तेजीत राहतील, असेही सांगितले जाते.

चांदूरबाजार भागात मोठ्या क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. यातील ४० टक्‍के बागा फायटोप्थोरा प्रभावित असल्याचे दिसून आले आहे. त्याचा थेट उत्पादकतेवर परिणाम होणार आहे. गेल्यावर्षी पाऊस अधिक झाला. त्यामुळे प्रादुर्भाव वाढला. त्यातून झाड कमजोर झाल्याने अपेक्षित फुट झाली नाही.
मयूर देशमुख, प्रयोगशील शेतकरी, काजळी, चांदूरबाजार, अमरावती
पाणी साचल्यास मुळाद्वारा फायटोप्थोरा प्रसारित होतो. परिणामी झाडातून डिंकाचा स्राव होतो. त्यातून झाडाचा अन्न पुरवठा थांबतो. याच्या नियंत्रणासाठी मुळाजवळ हवा खेळती ठेवावी. त्यातून मुळे सक्रिय राहतात. त्याबरोबरच पाणी साचू नये याची दक्षता घेतली पाहिजे. त्याकरिता सक्षम निचरा प्रणाली तसेच ठिबक सिंचनाचा पर्याय असला पाहिजे. गादीवाफ्यावरील लागवड पद्धतीत फायटोप्थोराचे ९५ टक्‍के नियंत्रण शक्‍य होते असे निरीक्षण आहे. त्यामुळे या पद्धतीचा अंगिकार शेतकऱ्यांनी केला पाहिजे.
डॉ. डी. एम. पंचभाई, अधिष्ठाता, उद्यानविद्या विभाग, डॉ. पंदेकृवी, अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

Agriculture Tools Bank: महिला गटांसाठी कृषी अवजारे बँक

Maharashtra Rain Alert: वादळी पावसासह उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT