Phule Triveni Cow Agrowon
ॲग्रो विशेष

गोपालनासाठी फुले त्रिवेणी गाय फायदेशीर

फुले त्रिवेणी गाय महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्पावर विकसित केलेली आहे.

Team Agrowon

सर्वसाधारण उपलब्ध संकरित गायीमधील वेगवेगळ्या गुणदोषांचा विचार करून त्यातील दोष कमी करून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल अशी फुले त्रिवेणी गाय महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्पावर विकसित केलेली आहे. फुले त्रिवेणी (Phule Triveni Cow) ही गायब होलस्टेन फ्रीजियन ५० टक्के, जर्सी २५ टक्के व गीर २५ टक्के या जातींचा संकर आहे. त्यामुळे अधिक दूध उत्पादन (Milk Production), अधिक स्निग्धांश (Fat) व उत्तम रोग प्रतिकारक क्षमता यांचा त्रिवेणी संगम या तिहेरी संकरित जातीत साधला आहे.

फुले त्रिवेणी गायीची वैशिष्ठे

- या जातीचे विताचे सरासरी उत्पादन ३००० ते ३५०० लिटर असून दुधातील सिद्धांशाचे प्रमाण ३.८ ते ४.२ टक्के आहे.

- या गायीची रोगप्रतिकारक क्षमता ही चांगली आहे या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या पुढील पिढ्यांची दुग्धोतेपादन क्षमता ही मूळ पिढ्या एवढीच जवळपास कायम राखली जाते.असे संशोधनाअंती आढळून आले आहे.

- शेतकऱ्यांच्या शेतावर सुद्धा या गायीनी सर्वसाधारणपणे चांगली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

- फुले त्रिवेणी वळूची गोठीत वीर्य गो संशोधन व विकास प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

जास्त दुध देण्याची क्षमता असणाऱ्या फुले त्रिवेणी या गायीच्या व्यवस्थापनामध्ये संतुलित आणि सकस चारा, खाद्य, क्षाराचे प्रमाण व पिण्यासाठी भरपूर आणि स्वच्छ शुद्ध पाणी,इ. बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. याशिवाय अद्ययावत गोठे, शारीरिक स्वच्छता, रोग नियंत्रणासाठी लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, हाताळण्याची आणि पाळण्याची पद्धत अशा अनेक व्यवस्थापनाकडे बारकाईने लक्ष दिल्यास फुले त्रिवेणी गाय दुग्ध व्यवसायासाठी इतर जातीपेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Bhavan: चिचोंडी पाटील उपबाजार समितीत साकारणार आधुनिक शेतकरी भवन

Tadoba Rescue Centre: ताडोबा ‘रेस्क्यू सेंटर’साठी ‘सर्वोच्च’ परवानगीची प्रतीक्षा

Panand Road Open: असोला-मुरुंबा रिंगण पाणंद रस्ता झाला खुला

Sangli APMC Dispute: बाजार समिती त्रिभाजन याचिकांवरील सुनावणी तहकूब

Fodder Security Plan: नांदेड जिल्ह्यासाठी विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा

SCROLL FOR NEXT