Phadke Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ghatghar Tourism: घाटघर येथील फडके बंधारा पहिल्या पावसातच तुडुंब

Phadke Dam Overflow: पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या ऐतिहासिक नाणेघाटाजवळील ब्रिटिशकालीन फडके बंधारा तुडुंब भरून वाहू लागला आहे.

Team Agrowon

Junnar News: पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या ऐतिहासिक नाणेघाटाजवळील ब्रिटिशकालीन फडके बंधारा तुडुंब भरून वाहू लागला आहे. गेल्या दोन- तीन दिवसांपासून नाणेघाट परिसरात पाऊस होत असून, सोमवारी (ता. १६) पावसाचा जोर वाढला आहे.

हा बंधारा भरल्याने घाटघर (ता. जुन्नर) ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. बंधाऱ्याच्या खालील बाजूस असलेल्या पायऱ्यावर बसून बंधाऱ्यातून पडणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करत असतात.

महात्मा फुले जल समृद्धी योजनेअंतर्गत, तसेच रोटरी क्लबच्या माध्यमातून बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आला आहे. तसेच जलसंधारण विभागाने बंधाऱ्यांची उंची तीन मीटरने वाढविली. गाळ काढण्याचे व उंची वाढविण्याचे महत्त्वपूर्ण काम झाल्याने बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

यामुळे गेल्या तीन चार वर्षांपासून येथील पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे. आदिवासी पश्चिम भागातील घाटघर व परिसरात पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे १०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी हा बंधारा उभारला होता. त्याचे काम फडके कंपनीने केल्यामुळे त्याला फडके बंधारा म्हणून ओळखले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT