Chana  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Pest Disease : हरभऱ्यावर मर रोग, घाटे अळीचा प्रादुर्भाव

Chana Pest : मॉन्सूनोत्तर पावसानंतर परभणी-हिंगोली जिल्ह्यातील हरभरा पिकांवर मोठ्या क्षेत्रावर मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

माणिक रासवे

Parbhani News : मॉन्सूनोत्तर पावसानंतर परभणी-हिंगोली जिल्ह्यातील हरभरा पिकांवर मोठ्या क्षेत्रावर मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. घाटे अळी या किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. कीड व रोगांमुळे हजारो हेक्टरवरील हरभरा पीक नष्ट होत आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील हरभरा हे प्रमुख नगदी पीक झाले आहे. गेल्या काही काही वर्षांत हरभरा पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यंदा मंगळवार (ता. २८) पर्यंत परभणी जिल्ह्यात १ लाख १२ हजार १७० पैकी ८९ हजार ३२२ हेक्टर (७९.६३ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात १ लाख २० हजार १४७ पैकी ८० हजार ४५० हेक्टर (६६.९६ टक्के) पेरणी झाली आहे.

ऑक्टोबर महिन्यात पाऊस न झाल्यामुळे सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी जमीन ओलावून पेरणी. परंतु जिरायती क्षेत्रात कमी ओलाव्याअभावी हरभऱ्याची उगवण कमी झाली. अजिबात ओलावा नसलेली जमीन नापेर राहिली होती.

सध्या हरभरा पीकवाढीच्या तसेच फुलोरा लागण्याच्या अवस्थेत आहे. ता. २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. जोरदार पावसामुळे हरभरा पिकांमध्ये पाणी साचून राहिले. अनेक भागांत पीक पाण्याखाली गेले. जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत होता.

मागील आठवडाभरात मर रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला आहे. या दोन जिल्ह्यांतील हजारो हेक्टरवरील हरभऱ्याचे उभे पीक पिवळे पडून वाळून गेले. पीक विरळ झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हरभरा पीक मोडून टाकावा लागला. त्यानंतर दुबार पेरणी केली. परंतु त्यानंतरही अनेक भागांत मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

घाटे अळीचा प्रादुर्भाव...

ढगाळ वातावरण तसेच आर्द्रता वाढल्यामुळे हरभरा पिकांवर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही अळी पाने, फुले खाऊन फस्त करत आहे. या दोन जिल्ह्यांतील घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर यांनी सांगितले.

ऑक्टोबर महिन्यात जमीन भिजवून हरभऱ्याची पेरणी केली. परंतु जोरदार पावसानंतर मर लागली. त्यामुळे सात ते आठ एकर हरभरा मोडून दुबार पेरणी केली. परंतु अजूनही मर रोग तसेच हिरव्या अळीचा प्रादुर्भाव आहे. परत हरभरा मोडून टाकण्याची वेळ आली आहे.
- नरसिंग आळसे, ब्रम्हपुरी, ता. परभणी
वाढीच्या अवस्थेतील चार एकर हरभरा पिकांवर मोठ्या प्रमाणावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. पिवळे पडलेले विरळ झालेले पीक मोडून टाकले. गहू पेरला. आमच्या गावातील शेकडो हेक्टरवरील हरभरा मर व किडीचा प्रादुर्भावामुळे नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
- काशिनाथ सांगळे, केळी, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT