Chana Crop Management : हरभऱ्याची जास्तीची वाढ कशी रोखायची?

Radhika Mhetre

ओलीत व्यवस्थापन

हरभरा पिकात पेरणीपूर्वीचे ओलीत व त्यानंतर वाढीची अवस्था आटोपल्यानंतर कळी अवस्थेच्या सुरुवातीला ओलीत द्यावे.

Chana Crop Management | Agrowon

कामगंध सापळे

पीक फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी (साधारणत: ७ ते १० दिवस आधी) शेतात कामगंध सापळे लावावेत. या सापळ्यांमध्ये घाटे अळीच्या हेलील्युअरचा वापर करावा. 

Chana Crop Management | Agrowon

घाट्यांमध्ये दाणे भरताना

गरज भासल्यास घाट्यांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेला ओलित द्यावे. या वेळी सुद्धा जमिनीतील ओलीनुसार निर्णय घ्यावा.

Chana Crop Management | Agrowon

शेंडे खुडने

हरभऱ्याचे शेंडे खुडल्यानंतरही अवास्तव वाढ रोखता येते. निंदणीच्या काळात महिला मजूर भाजीसाठी झाडांचे शेंडे खुडून घेतात. असे शेंडे खुडल्यामुळे अवास्तव वाढ टाळता येते. पेरणीपासून साधारणत: २७ ते ३२ दिवसांनी मशिनच्या साह्याने पिकाचे शेंडे छाटून घ्यावेत.

Chana Crop Management | Agrowon

घाटेअळी

हरभरा पिकावर घाटेअळी ही मोठी समस्या ठरते. घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिकाचे संरक्षण करण्याकडे लक्ष द्यावे.

Chana Crop Management | Agrowon

पक्षिथांबे

हरभऱ्याचे पीक कळी अवस्थेत येण्यापूर्वी, पिकाच्या उंचीपेक्षा ४ ते ५ फूट जास्त उंचीचे पक्षिथांबे एकरी १२-१५ प्रमाणात उभारावेत. याकरिता साधारणत: ५.५ ते ६ फूट लांबीच्या काठीला एका बाजूने टोक काढावे. 

Chana Crop Management | Agrowon

स्प्रिंकलरचा वापर करताना

स्प्रिंकलरचा वापर करताना जमिनीच्या प्रकारानुसार आणि ओलीची स्थिती पाहून पाण्याच्या पाळीची वेळ ठरवावी. म्हणजेच स्प्रिंकलर किती वेळेसाठी लावायचे, हे ठरवावे. अन्यथा बुरशीजन्य मुळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

Chana Crop Management | Agrowon
Wheat Irrigation | Agrowon