Galyukt Shiwar Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Galyukt Shiwar Yojana : कोल्हापुरात ‘गाळयुक्त शिवार’ची थकित बिले अखेर जमा

Pending Dues : ‘गाळयुक्त शिवार’ योजनेतील थकित बिले अखेर तब्बल दहा महिन्यांनंतर जमा झाली आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : ‘गाळयुक्त शिवार’ योजनेतील थकित बिले अखेर तब्बल दहा महिन्यांनंतर जमा झाली आहेत. जिल्ह्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांची सुमारे ६० लाख रुपयांची बिले थकीत होती. सरकारकडून ही बिले मिळाल्याने बिलाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ३५ रुपये व यंत्रसामग्रीसाठी ३१ रुपये दर निश्‍चित करण्यात आला होता. त्यानुसार हे पैसे काम झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिले जाणार होते. पैसे मिळणारच या विश्‍वासावर पदरमोड करून शेतकऱ्यांनी गाळ काढून नेला. त्यासाठी काहींनी स्वतःची, तर काहींनी भाड्याची यंत्रसामग्री वापरली; परंतु त्यासाठी सरकारने जाहीर केलेले पैसे मिळाले नव्हते. विधानसभा

निवडणुकीच्या आचारसंहितेसह विविध कारणे सांगून ही रक्कम प्रलंबित ठेवण्यात आली होती. त्यासाठी शेतकऱ्यांकडून पाठपुरावा सुरू होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१४ पासून ‘जलयुक्त शिवार’ योजना अस्तित्वात आली.

त्यानंतर ती व्यापक होऊन ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही नवीन योजना कार्यान्वित झाली. २०१९ नंतर महाविकास आघाडीच्या काळात ही योजना थोडी थंडावली होती. पुन्हा महायुती सरकार आल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू केली.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी नदी, नाले, तलावातील गाळ काढून नेला. याची सुमारे ६० लाख रुपयांची बिले त्यांच्याकडून जलसंधारण विभागाला सादर करण्यात आली; परंतु आजतागायत ही रक्कम मिळाली नव्हती. राज्य सरकारकडून अचानक बिले जमा झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. ही रक्कम जलसंधारण विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतीकडे जमा होणार आहेत. तेथून ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT