PDKV Akola  Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV Akola : इन्स्टिट्यूशनल फेलो पुरस्काराने ‘पंदेकृवि’चा झाला सन्मान

Dr. Sharad Gadakh : विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनादेखील त्यांच्या शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यासह विकासात्मक कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील ऑनर्ड फेलो ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला.

 गोपाल हागे

Akola News : नवी दिल्ली येथील कॉन्फीडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (सीएचएआय) या राष्ट्रीय स्तरावरील संघटनांच्या महासंघाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला कृषी शिक्षण, संशोधन आणि कृषी उत्पादनवाढीमध्ये उत्कृष्ट योगदानासाठी सीएचएआय-२०२५ चा संस्थात्मक फेलो पुरस्कार देऊन सन्मानित केले.

भारतीय उद्यानिकी संघटनांच्या महासंघाद्वारे बिहार राज्यातील साबौर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन परिसंवादाचे औचित्य साधत देशभरातील उद्यानिकी शास्त्रज्ञांसमक्ष कृषी क्षेत्रातील कामगिरीसाठी पंदेकृविला इन्स्टिट्यूशनल फेलो ॲवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनादेखील त्यांच्या शिक्षण, संशोधन, विस्तार कार्यासह विकासात्मक कार्याची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील ऑनर्ड फेलो ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या वतीने विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेचे संचालक प्रा. डॉ. प्रकाश कडू यांनी पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्काराबद्दल विद्यापीठ परिवाराच्या वतीने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अभिनंदन करण्यात आले. या सत्कार प्रसंगी कृषी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, उद्यानविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. अरविंद सोनकांबळे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे, विद्यापीठ नियंत्रक राजीव कटारे, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, सर्व वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती.

हा सन्मान विद्यापीठातील विद्यार्थी, कामगारांसह प्रत्येक घटकाचा आहे. किंबहुना विदर्भातील प्रत्येक शेतकऱ्याचा सन्मान आहे. शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी ही संकल्पना वास्तवात आणण्यासाठी सहभागी प्रत्येक घटकाचा हा सन्मान असून या पुरस्काराने आम्हा सर्वांना अधिक सकारात्मकतेने आणि जोमाने नावीन्यपूर्ण शाश्वत शेती तंत्रज्ञान उपयोगितेसाठी बळ मिळेल.
- डॉ. शरद गडाख, कुलगुरू, पंदेकृवि, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT