Raju Shetty Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bill : ऊस दराचा दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांना द्या

Raju Shetti : ऊस दराचा दुसरा हप्ता देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.

Team Agrowon

Kolhapur News : मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या मध्यस्थीने सन २०२२-२३ या गळीत हंगामात तुटलेल्या उसाला प्रतिटन ३ हजारांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी प्रतिटन १०० रुपये व ३ हजारांपेक्षा जादा दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये दुसरा हप्ता देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.

सन २०२२-२३ या हंगामातील ऊस दराचा हप्ता दोन महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरले होते. यानंतर काही साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता देण्याबाबतचे प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवून सात महिने झाले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्ताधारी व विरोधी कारखानदारांच्या इशाऱ्यावर राज्य सरकारकडून मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील ऊसदर नियंत्रण समितीची बैठक लांबवून जाणीवपूर्वक दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत.

चालू वर्षी महापुरामुळे गेल्या १५ दिवसांपासून ऊसपीक पाण्यात बुडून मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सन २०२१ मध्येही महापुरात शेतकऱ्यांची राखरांगोळी झालेली आहे.

अशात जर कारखान्यांनी तातडीने दुसरा हप्ता जमा केला तर शेतकऱ्यांना आधार होईल. एकीकडे शेतकऱ्यांबद्दल कळवळा असल्याचे नाटक राज्य सरकार करीत आहे, तर दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राखरांगोळी करून कारखानदारांचे हित जोपासत आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

‘‘दुसरा हप्ता मिळण्यासाठी गेल्या सात महिन्यांत मुख्यमंत्री यांना पाचवेळा व मुख्य सचिव यांची सहावेळा भेट घेऊन वारंवार मागणी करूनही राज्य सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे,’’ असेही शेट्टी म्हणाले.या वेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, राजाराम देसाई, अप्पा एडके, धनाजी पाटील, शिवाजी पाटील, मिलिंद साखरपे, शैलेश आडके, राम शिंदे, सुधीर मगदूम, अण्णा मगदूम, भीमराव गोनुगुडे, संपत पवार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT