Tur Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Bajarbhav : आमच्या तुरीला किमान २० टक्के जास्त हमीभाव द्या; कलबुर्गीच्या शेतकऱ्यांची मागणी

Tur Update : कलबुर्गी येथील तुरीला जीआय मानांकन मिळालेला आहे. त्यामुळे कलबुर्गी तुरीला इतर तुरीच्या तुलनेत २० टक्के अधिक हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

Anil Jadhao 

Pune News : कलबुर्गी येथील तुरीला जीआय मानांकन मिळालेला आहे. त्यामुळे कलबुर्गी तुरीला इतर तुरीच्या तुलनेत २० टक्के अधिक हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावी. तसेच जीआय मानांकन मिळालेल्या पिकांना वैज्ञानिक आणि रास्त भावाचा विचार करून हमीभाव द्यावा, अशीही विनंती कर्नाटका प्रदेश रेड ग्राम प्रोड्यूसर्स असोसिएशनने केली आहे. 

कलबुर्गी जिल्ह्यात उत्पादीत होणाऱ्या तुरीला २०१९ मध्ये जीआय मानांकन मिळाले आहे. या जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्रावर तुरीचे उत्पादन घेतले जाते. तसेच जमिनीची गुणवत्ता चांगली असल्याने या जिल्ह्यात उत्पादीत होणाऱ्या तुरीचे वेगळेच वैशिष्ट्ये आहे. येथील तुरीमध्ये जास्त कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. या जमिनिमुळे तुरीला वेगळीच चव आणि सुवास येतो. ही तूर जास्त प्रोटीनमुळे जास्त पौष्टीक बनते, असे कर्नाटका प्रदेश रेड ग्राम प्रोड्यूसर्स असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज इंगिन यांनी सांगितले. 

वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे इतर तुरीच्या तुलनेत कलबुर्गीच्या तुरीला वेगळा बाजारभाव मिळायला हवा. जीआय मानांकन मिळालेल्या तुरीला वेगळा हमीभावही मिळायला हवा. इतर तुरीच्या तुलनेत किमान २० टक्क्यांनी जास्त हमीभाव द्यावा. जीआय मानांकन पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घ्यावा. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने हा फरक लक्षात घेऊन वेगळा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी या असोसिएशनने पंतप्रधान कार्यलयाला लिहीलेल्या पत्रात केली आहे. 

वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे कलबुर्गीच्या तुरीला जीआय मानांकन मिळाले. या तुरीच्या उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आवश्यक आहे. तसेच या गुणवत्तेची तूर उत्पादीत होणे आवश्यक आहे, त्यासाठीही शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहीजे. यासाठी सरकारने कलबुर्गीच्या तुरीला किमान २० जास्त हमिभाव द्यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT