Girish mahajan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाई अदा करा ; गिरीश महाजन

Advance Crop Insurance : पीकविम्याच्या शासन निर्णयानुसार प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांनुसार २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात अदा करण्याच्या सूचना ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील कापूस, उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याच्या शासन निर्णयानुसार प्रतिकूल हवामान परिस्थितीच्या निकषांनुसार २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात अदा करण्याच्या सूचना ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात मागील २५ ते ३० दिवसांपासून पावसाचा खंड पडलेला असून, खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटलेली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या सर्वसमावेशक पीकविमा योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील चार लाख ५४ हजार २७७ शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा पीकविमा काढलेला आहे.

या विम्याच्या निकषानुसार हंगामातील प्रतिकूल हवामान परिस्थिती उद्‍भवली आहे. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ अधिसूचना निर्गमित करून संबंधित विमा कंपनीकडून पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाईची रक्कम अग्रिम स्वरूपात अदा करण्यात यावी, जिल्ह्यातील पावसाचा अहवाल संकलित करून जळगाव जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने (२.५५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडल्याने) संबंधित महसूल मंडळातील शेतकरी झालेल्या नुकसानीची भरपाईस पात्र असून, तत्काळ संबंधित विमा कंपनीस याबाबत २५ टक्के अग्रिम स्वरूपात नुकसानभरपाई देण्याच्या जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींनीना सूचना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग राज्याची रक्तवाहिनी, शेतकऱ्यांना पाचपटीने मोबदला मिळणार- बावनकुळे

Jowar Pomegranate Rate: ज्वारी, उडदाचे भाव चढ-उतार; डाळिंबाचे दर तेजीत

Sugar Industry: सांगली जिल्ह्यातील साखर उद्योगाला १६८ कोटींचा ‘सॉफ्ट’ आधार

Sunflower Sowing Preparation: खानदेशात सूर्यफूल पेरणीची तयारी

Agrowon Podcast: ज्वारी बाजारात चढ-उतार, उडदाच्या आवकेत बदल, हिरव्या मिरचीच्या दरात स्थिरता, कोथिंबीर दरात चढ-उतार तर डाळींबाचे दर तेजीत

SCROLL FOR NEXT