Harshwardhan Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Cooperative Sugar Mills : राष्ट्रीय साखर कारखाने महासंघाच्या अध्यक्षपदी पाटील

मनोज कापडे

Pune News : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. श्री. पाटील सहकारी साखर उद्योगातील अभ्यासू नेते समजले जातात. इंदापूरच्या नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक संचालक आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ते संचालक आहेत. देशभरातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या महासंघाचे अध्यक्षपद सहकारात अतिशय मानाचे समजले जाते. सध्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे विश्वासू जयप्रकाश दांडेगावकर यांच्याकडे अध्यक्षपद होते.

विशेष म्हणजे गेल्या चार दशकात महासंघाचे अध्यक्षपद एकदाही भाजप समर्थक गटाकडे गेले नव्हते. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार महासंघाचे अध्यक्षपद श्री. पाटील यांच्याकडे २०२९ पर्यंत सोपविण्यात आल्याचे समजते.

चार वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या श्री. पाटील यांना आतापर्यंत कोणतेही पद मिळालेले नव्हते. त्यांना राज्यसभेवर पाठविले जाईल, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. परंतु, ती संधी हुकल्यामुळे श्री. पाटील यांच्या गळ्यात महासंघाचे अध्यक्षपद पडल्याची चर्चा आहे.

महासंघाच्या दिल्लीतील मुख्यालयात शुक्रवारी (ता.१६) झालेल्या सर्वसाधारणसभेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. गुजरातचे केतनभाई पटेल यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपद देण्यात आले. निवड होताच ते श्री. शहा यांना भेटण्यासाठी रवाना झाले. हर्षवर्धन पाटील चार वेळा मंत्री होते.

इंदापूर मतदार संघ त्यांचा बालेकिल्ला समजला जात होता. ते १९९५, १९९९, २००४ अपक्ष म्हणून तर २००९ कॉंग्रेसच्या तिकिटावर असे सलग चारवेळा आमदार होते. मात्र, या बालेकिल्ल्यावर २०१४ व २०१९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दत्तात्रेय भरणे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला.

देशातील साखर उद्योग, सहकारी साखर कारखाने, शेतकरी आणि ऊस उत्पादकांच्या समस्यांचा पाठपुरावा करू. तसेच सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्तावाढ व विकासासाठी माझे प्रयत्न असतील.
- हर्षवर्धन पाटील

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT