शरीराच्या संपूर्ण मज्जा संस्थेवर परिणाम करणारा असा पार्किन्सन आजार (Parkinson's Disease) आहे. मंद हालचाली, कंप, तोल सावरला न जाणे यासारख्या लक्षणांसाठी हा आजार ओळखला जातो. बहुतांश वेळा हा आजार अज्ञात कारणांमुळे होतो. परंतु, काही प्रमाणात हा आजार आनुवंशिक देखील आहे. पार्किन्सन हा एक हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. सुरुवातीला हाताला कंप येणे हे लक्षण दिसून येते. पार्किन्सन रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, चेहऱ्यावर थोडेसे किंवा कोणतेही भाव दिसू शकतात, नंतर लक्षणे वाढत जातात. त्यामुळे वेळीच उपचार करणे फायदेशीर आहे.
लक्षणे
सुरुवातीची लक्षणे सौम्य असतात. लक्षणे अनेकदा शरीराच्या एका बाजूने सुरू होतात आणि सामान्यतः त्या बाजूला आणखी वाढतात. कालांतराने लक्षणे दोन्ही बाजूंच्या अवयवांवर परिणाम करू लागतात. पार्किन्सनच्या लक्षणांमध्ये थरथरणे, हालचाल मंद होऊ शकते, शरीराच्या कोणत्याही भागात स्नायू कडक होऊ लागतात. कडक स्नायू झाल्यामुळे हालचाल मर्यादित होऊ शकते. स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण राहत नाही. बोलण्यामध्ये बदल होतो. अनियंत्रित हालचाल होत असल्याने चालणे, लिहिणे, काम करणे अवघड होते.
कारणे
वाढणारे वय, आनुवंशिकता, पर्यावरणातील विषारी घटकांच्या संपर्कात आल्याने पार्किन्सन आजार होण्याचा धोका असतो.
जोखमीचे घटक
वाढत जाणारे वय - ६० पेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना पार्किन्सन आजाराचा जास्त त्रास होतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांना पार्किन्सन रोग होण्याची शक्यता जास्त असते.
निदान
लक्षणांवरून आजाराची निश्चिती करता येते. पार्किन्सन रोगाचे निदान करण्यासाठी विशिष्ट चाचणी उपलब्ध नाही. उपचार न केल्यास होणारी गुंतागुंत म्हणजे विचार करण्यात अडचणी, नैराश्य आणि भावनिक बदल, गिळण्याची समस्या, चघळणे आणि खाणे समस्या, झोपेच्या समस्या आणि झोपेचे विकार, लोकांना जलद डोळा हालचाल स्लिप बिहेवियर डिसऑर्डर देखील होऊ शकते. मूत्राशयाच्या समस्या उद्भवू शकतात, लघवीवर नियंत्रण ठेवता येत नाही, अनेकांना बद्धकोष्ठता निर्माण होते. रक्तदाब कमी जास्त होणे, वास न समजणे, वारंवार थकवा जाणवणे यावरून पार्किन्सनचे निदान करता येते.,
प्रतिबंध कसा करावा
पार्किन्सन आजाराचे कारण माहीत नसल्यामुळे, रोग टाळण्यासाठी कोणताही निश्चित मार्ग नाही. नियमित वयं आणि निरोगी जीवनशैली यामध्ये आजारापासून दूर राहण्यासाठी फायदेशीर आहे.
उपचार
पार्किन्सनवर कोणतेही प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत. लक्षणे नियंत्रित करण्यात औषधे मदत करू शकतात.
आयुर्वेद आणि पार्किन्सन
पार्किन्सन रोगाचा संबंध आयुर्वेदातील कंपवात नावाच्या आजाराशी आहे. शरीराच्या सर्व भागांमध्ये सामान्यपणे अनैच्छिक हालचाली होत असतात. आयुर्वेदामध्ये उपचार करताना शरीराची झालेली झीज भरून काढणे आणि रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेला अडथळा नाहीसा करण्यासाठी औषधे आणि पंचकर्म याचा वापर करता येतो. पंचकर्म मधील बस्ती, स्नेहन, स्वेदन, शिरोधारा, नस्य हे फायदेशीर आहेत. पंचकर्म उपचारानंतर झालेली झीज भरून काढण्यासाठी रसायन उपचार फायदेशीर आहेत.
आसन
आसने नियमित केल्याने शरीराचे चांगले संतुलन राहते, चालताना सहजता येते, स्नायूंचा कडकपणा कमी होण्यास मदत करते, तसेच आत्मविश्वास, आत्मसन्मान वाढवते आणि सकारात्मक भावना निर्माण होते. आसनांमध्ये - भद्रासन, ताडासन, वृक्षासन, उर्ध्वा हस्तासन, उत्तानासन, विरभद्रासन, बद्ध कोनासन ही आसने फायदेशीर आहेत.
जीवनशैलीमधील बदल
वयोमानानुसार आहार आणि जीवनशैलीमध्ये आवश्यक असणारे बदल करणे गरजेचे आहेत. पार्किन्सन आजारात शरीराचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असणारा पचायला हलका असा ताजा आहार घ्यावा. सर्व प्रकारच्या फळांचा आहारात समावेश करावा.
व्यायाम ः नियमित चालणे हा सोपा व्यायाम खूप फायदेशीर आहे. या आजारामध्ये शरीरावरील नियंत्रण कमी झाल्याने फक्त एक लहानसा धक्का किंवा धक्क्याने तोल सुटला जाऊ शकतो. त्यामुळे एकदम एका पायावर फिरवण्याऐवजी यू-टर्न घ्या, चालताना वस्तू घेऊन जाणे टाळा. शरीराचे वजन दोन्ही पायावर समांतर राहील अशा रीतीने चालणे, उभे राहण्याचा प्रयत्न करा. दैनंदिन जीवनातील क्रिया... जसे की कपडे घालणे, जेवण करणे, आंघोळ करणे आणि लिहिणे हे पार्किन्सन आजार असलेल्या लोकांसाठी त्रासदायक बनते. यासाठी थेरपिस्ट / मदतनिसाची मदत घ्या. बोलण्यात अडचण येत असल्यास, स्पीच थेरपिस्ट मदत करू शकतो. नैराश्य टाळावे - यासाठी आवडणारे काम करावे, गप्पा माराव्यात, पुस्तक वाचणे, फिरणे या गोष्टी कराव्यात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.