Ahilyanagar News: पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील दहा आरोपींना दिलेला अटकपूर्व जामीन अहिल्यानगर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी रद्द केला आहे. आरोपींना तातडीने अटक करून पुढील तपासाचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. .पारनेर कारखाना बचाव समितीचे अॅड. रामदास घावटे यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीत अनियमितता झाल्याचे निदर्शनात आले. त्यानंतर पारनेर बचाव समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाने क्रांती शुगर या खाजगी कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले, संचालक पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले..Sjirpur Sugar Mill : शिरपूर साखर कराखाना यंदाही बंदच.शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले आदींवर पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर वर्षभरापूर्वी राज्य सहकारी बँक आणि क्रांती शुगर कंपनीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. पुढे सत्र न्यायालयाने आरोपींचा रिव्हीजन अर्ज फेटाळला, त्यानंतर आरोपींनी सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज अटी-शर्ती नुसार मंजूर केला होता. .मात्र न्यायालयाने घातलेल्या अटी - शर्तीचा भंग केल्याचा प्रकार लक्षात येताच, याप्रकरणी फिर्यादी असलेल्या पारनेर कारखाना बचाव समितीने आरोपींचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत अटकपूर्व जामीन जामीन न्यायालयाने रद्द केला आहे..राजकीय दबावाचा आरोपगुन्ह्यात एकूण ४२ साक्षीदार आहेत. आरोपींच्या राजकीय दबावापोटी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात नसल्याचा आरोप अॅड. घावटे यांनी केला असून तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे. नाहीत. सदर प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांच्यासमोर झाली. कारखाना बचाव समितीची बाजू ॲड. रामदास घावटे, ॲड. सुदाम साठे, ॲड. उन्मेश चौधरी यांनी, ॲड. सोमनाथ गोपाळे मांडली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.