Tur Wilt Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Disease : अतिवृष्टीनंतर तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

Para Wilt Disease : अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना आंतरपीक असलेल्या तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडले आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना आंतरपीक असलेल्या तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडले आहेत. यंदा पाऊसमान चांगले असल्याने सोयाबीन व आंतरपीक असलेले पीक तरारून वर आल्याने शेतकरी आनंदित होते.

परंतु गेला शनिवार ते सोमवारदरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनीत भरपूर ओलावा निर्माण झाला. त्याचा फटका बसत तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

वालतूर रेल्वे शिवारातील सूर्यकांत पाटील, किशोर जामगडे, चंद्रकांत जामगडे, शशिकांत जामगडे व लगतच्या शेतकऱ्यांचे पीक यामुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहे. तसेच कुठे कुठे सोयाबीनवरही मर रोग आला आहे. अशीच काहीशी परिस्थिती शिवारातील शेतकऱ्यांची आहे.

सध्या खरीप पिकामधील तुरीचे दर चांगले असल्याने शेतकरी जैविक औषधांची फवारणी करून पीक वाचविण्याची धडपड करीत आहेत. सध्या कृषी विभागाचे अधिकारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामात व्यस्त असून, कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या सल्ल्याने शेतकरी फवारणी करीत आहेत.

तुरीवर आलेल्या रोगामुळे शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला असून, कृषी विभागाने गावोगावी यावर उपाययोजना करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT