Ashadhi Wari 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Vithhal Rukmini Darshan : पंढरपुरात आजपासून टोकन दर्शन प्रणालीची चाचणी

Token Darshan System : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्त्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेण्यात आली आहे.

Team Agrowon

Pandharpur News : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शन प्रणालीची चाचणी रविवारी (ता.१५) घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रथम चाचणी दिवशी सुमारे १२०० टोकन उपलब्ध होणार असून, त्याचे बुकिंग भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिले असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्त्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करून घेण्यात आली आहे.

दरवर्षी वारकरी भाविकांची वाढती संख्या पाहता, भविष्यात दर्शन रांग आणि सोयीसुविधा व्यवस्थापनावर काम करणे अत्यावश्यक आहे. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता, ठरावीत वेळेत दर्शनहॉलच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश करता येणार आहे, ही प्रणाली विशेषत: गर्दीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करण्यास प्रभावी ठरेल.

दर्शन मंडपात सर्व सुविधा

टोकन दर्शन प्रणालीची प्रथम चाचणी घेण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी झाली आहे. त्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथील दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यावर प्रतिक्षा हॉल तयार केला असून, त्याठिकाणी बैठक व्यवस्था, प्रसाधन गृह, पिण्याचे पाणी, चहा, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, सुरक्षा रक्षक, दिशादर्शक व आपत्कालीन मार्ग फलक, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी आनुषंगिक व्यवस्था करण्यात आली आहे, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

प्रथम चाचणीचे टोकन सुरू

टोकन दर्शन प्रणालीच्या प्रथम चाचणीचे टोकन शनिवारपासून (ता.१४) पासून www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन पद्धतीने तयार झालेले टोकन प्रिंट करून, निश्चित करून दिलेल्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पंढरपूरच्या उत्तरेकडील मागील बाजूस प्रवेश करून टोकनची पडताळणी करून घेणे व तद्नंतर दर्शनहॉलमध्ये प्रवेश दिला जाईल व वेळेनुसार थेट दर्शन रांगेत प्रवेश होऊन भाविकांचे सुलभ दर्शन होणार असल्याचे औसेकरमहाराज यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दसऱ्यानंतरच पाऊस ओसरणार

India-Russia Relation : भारत-अमेरिकेसाठी ‘तो’ निकष अयोग्य

Banana Market : हिंगोली जिल्ह्यात केळीचे दर गडगडले

Baramati Cleanliness : बारामती, लोणावळा, चाकण शहरे इंदूरच्याधर्तीवर स्वच्छ करणार

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT