Suran Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Suran Farming : पांडे यांच्या शेतात १८ किलोंचा सुरण कंद

Elephant Foot Yam : चिरेखाण फाटा ते जानशी पठार या परिसरातील कातळ परिसरात राधेश्‍याम पांडे यांनी विकसित केलेल्या आंबा बागेमध्ये सुमारे दोन गुंठे जागेमध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून सुरणाची शेती केली आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : राजापूर, जि. रत्नागिरी ः चिरेखाण फाटा ते जानशी पठार या परिसरातील कातळ परिसरात राधेश्‍याम पांडे यांनी विकसित केलेल्या आंबा बागेमध्ये सुमारे दोन गुंठे जागेमध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून सुरणाची शेती केली आहे.

गेल्या चार वर्षांत सुमारे ५०० किलोंहून अधिक सुरण उत्पादन त्यांनी घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांना काही दिवसांपूर्वी तब्बल १८ किलो ७०० ग्रॅम वजनाचा सुरण मिळाला आहे.


श्री. पांडे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. शेतीच्या आवडीतून त्यांनी घराशेजारील शेतात हापूस आंबा बाग लावलेली आहे.

त्यातील सुमारे दोन गुंठे जागेत त्यांनी सुरणची लागवड केली आहे. दर्जेदार आणि चांगले उत्पादन मिळावे आणि जमिनीचा कस कायम राहण्यासाठी त्यांनी माती, गवत, शेणखत, राख आदीचा उपयोग करून शेती फुलविली.

सुरण लागवडीतून त्यांनी सुमारे ५०० हून अधिक किलो सुरण उत्पादन घेतले आहे. त्यास सरासरी ४० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT