Malinagar News : पंचवीस चार (ता. माळशिरस) ते टेंभुर्णी दरम्यान काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. साधारण दोन वर्षांपूर्वी काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याला दुरुस्ती काळातच (मेंटेनन्स पिरियड) तडे गेल्याने या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता व दर्जाविषयी शंका उपस्थित होत आहे.
त्यामुळे तडे गेलेल्या या रस्त्याची तपासणी करून त्याची तत्काळ चांगल्याप्रकारे दुरुस्ती व्हावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
कुर्डुवाडी-म्हसवड या मार्गावरील हा भाग आहे. पंचवीस चार ते संगमपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशगाव पाटी ते वाफेगाव पाटीदरम्यान कित्येक मीटरपर्यंत मोठे तडे गेले आहेत.
वाफेगाव पाटी ते संगम रस्त्यावर दूरपर्यंत लहान तडे (चिरा) आढळून येत आहेत. शेवरे ते टेंभुर्णी दरम्यान देखील काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर तडे गेल्याचे दिसत आहे.
काही ठिकाणी रस्त्याच्या वरचा पृष्ठभाग खरवडल्यासारखा झाल्याने त्याखालची खडी दिसू लागली आहे.
सध्या काही तडे मोठे तर काही छोटे दिसत असले तरी भविष्यात त्यामध्ये पावसाचे पाणी जाऊन व तापमानातील बदलामुळे तड्यांची लांबी व रुंदी वाढण्याची शक्यता आहे.
सध्या चारचाकी वाहनांना या तड्यांची अडचण जाणवत नाही; मात्र भविष्यात दुचाकी वाहनांसह चारचाकी वाहनांना हेच तडे अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
काही तुरळक ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारात द्रवरूप सिमेंट तड्यांमध्ये ओतून ते बुजविण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
दोन वर्षांपूर्वीच या रस्त्याच्या काही भागात काँक्रिटीकरण झाले असून, पाच वर्षे त्याचा दुरुस्ती कालावधी असल्याचे समजते. त्याच्या आतच रस्त्याला तडे गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हा रस्ता ऊस व अवजड वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.