Crop Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : अवकाळीच्या पंचनाम्यांची गती मंदावली

Unseasonal Rain Crop Survey : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार हेक्टरवरील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी पंचनामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार हेक्टरवरील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी पंचनामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. तहसील व कृषी विभागांतील कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने पंचनामे पूर्ण होण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गुढीपाडव्यापासून वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस सुरू आहे. तीन दिवस अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांना झोडपून काढले. वादळी वाऱ्यांबरोबरच मुसळधार पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात रब्बीतील पिकांसोबतच उन्हाळी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.

वादळी वाऱ्यांमुळे सूर्यफूल, तीळ, टरबूज, आंबा, लिंबू या पिकांसोबतच गहू, भाजीपाल्याला फटका बसला आहे. या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. अवकाळी पावसामुळे जिल्हाभरातील अडीच हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

पावसानंतर तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी अजूनही पंचनामे सुरू झालेले नसल्याचे दिसून येत आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक काही दिवसांवर आहे. त्यानंतर यवतमाळ-वाशीम व हिंगोली मतदार संघांची निवडणूक आहे.

बहुतांश कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र आहेत. परिणामी, पंचनामे करण्यासाठी यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळेच अजूनही पंचनामे झाली नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून सुरू आहे. शेतकरी अडचणीत असताना लोकप्रतिनिधी व प्रशासन निवडणुकीच्या कामात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.

सलग तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने उन्हाळी शेतपिकांना मोठा फटका बसला असून, फळपिकांचे नुकसान जास्त आहे. पंचनामे करताना यांची नोद व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

मुदतीत होणार पंचनामे

अवकाळी पावसामुळे तीन दिवसांत अडीच हजार हेक्टरवरील क्षेत्राला फटका बसला आहे. अशातच निवडणुका असल्याने कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र आहेत. प्रशासनाकडे आधीच कमी मनुष्यबळ आहे.

त्यात निवडणूक व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे अशी दुहेरी कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे. याबाबत नियोजन करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागांना मुख्यालयातून देण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT