Survey of crops Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : मिरज, पलूस, शिराळ्यातील पिकांचे पंचनामे कधी?

Crop Damage : आणखी किती दिवस करायची प्रतीक्षा, शेतकऱ्यांचा सवाल

Team Agrowon

Sangali News : सांगली ः अतिपावसामुळे वाळवा, मिरज, पलूस आणि शिराळा तालुक्यांतील पिकांचे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, मिरज, पलूस आणि शिराळा तालुक्यांतील बाधित पिकांचे अद्यापही पंचनामे सुरू झाले नाहीत. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यांत अतिवृष्टी झाली.

यामुळे मिरज, पलूस, शिराळा आणि वाळवा या चार तालुक्यांतील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. या चार तालुक्यांतील २१ हजार ३८९ शेतकऱ्यांचे २२ हजार ७५५ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे १०३ कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. वाळवा तालुक्यातील पिकांचे पंचनामे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी करण्यास सुरुवात केली.

गेल्या आठवड्यात वाळवा तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचमाने पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा कृषी कार्यालयात सादरही केला आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण करण्यात वाळवा तालुका आघाडीवर राहिला आहे. मिरज, पलूस आणि शिराळा तालुक्यांत अद्यापही कृषी विभागासह अन्य संबंधित विभागाने पंचनामे सुरू केले नसल्याचे चित्र आहे. या तीनही तालुक्यांतील पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. मात्र, याकडे कृषी विभागासह अन्य विभागाने दुर्लक्ष केले आहे.

दरम्यान, पलूस तालुक्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश गेल्या दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. त्यामुळे या तालुक्यातील पंचनामे दोन दिवसांत सुरू होतील अशी शक्यता आहे. मिरज आणि शिराळा या दोन तालुक्यांत पंचनामे करण्याचे आदेशच दिले नसल्याचे कृषी विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले. वास्तविक पाहता अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश एकाच वेळी दिले जातात. प्रत्येक तालुक्यात आदेश कसा दिला जात आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पलूस तालुक्याला पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी, पलूस, मिरज, शिराळात पंचनामे कधी होणार, असा सवाल शेतकरी करू लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT