Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पान पिंपरी पिकाला मदत जाहीर करा

Post Monsoon Rain : पानपिंपरी पिकाचे गेल्या आठवड्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यातील पानपिंपरी पिकाचे गेल्या आठवड्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या पिकासाठी शासनाने विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी पानपिंपरी उत्पादकांनी केली. याबाबत अकोला दौऱ्यावर असलेल्या विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेत निवेदन दिले.

निवेदनात म्हटले, की गेल्या आठवड्यात विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पानपिंपरी या वेलवर्गीय व आयुर्वेदामध्ये महत्त्वपूर्ण उपयोग असलेल्या पिकालाही फटका बसला. अकोला जिल्ह्यात अकोट व तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात या पिकाचे उत्पादन घेण्यात येते.

मात्र, ऐन पान पिंपरीचा बहर येऊन तोडणी सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण अकोट व तेल्हारा तालुक्यातील पान पिंपरी उत्पादन करणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला. शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले.

पान पिंपरीची नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांची जिल्हा संपर्कप्रमुख तथा उपनेते माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट घेतली.

या वेळी योगेश बुंदेले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोपाल नागपुरे यांनी उपरोक्त पिकांबाबत गोऱ्हे यांना माहिती दिली. तेल्हारा व अकोट तालुका शेतकरी विनोद नाठे, विजय नाठे, प्रमोद राऊत, गजानन दातीर, विलास ताडे, प्रतिक दामधर, संदीप ढगे, किशोर नाठे, रमेश रेखाते, प्रकाश दातीर, विनोद दामधर, जगन्नाथ धुळे, उमेश ताडे, नामदेव पोके, सुरेंद्र ताडे, योगेश दामधर, लक्ष्मण दामधर, रमेश धुळे, संतोष नाठे, किशोर नाठे हे या वेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cigarette Pan Masala Tax Hike: सिगारेट कंपन्यांना दणका, ४० टक्के कर लागू, सरकारच्या निर्णयाला तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध

Farmer Study Tour: शेतकऱ्यांनी अभ्यासले प्रक्रिया उद्योगासह रोपवाटिकेचे कामकाज

MSP Sales issues: बाजारभावामुळे हमीभावाचा प्रतिसाद थंडावला

Sugarcane Recovery Lab: लोकवर्गणीतून साकारणार ‘ऊस रिकव्हरी प्रयोगशाळा’

Leopard Roar: श्रीरामपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच

SCROLL FOR NEXT