Palghar News : पालघर : जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत ६० हजार ९१४ घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ६० हजार १९२ प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील देण्यात आला. म्हणजेच एकूण प्रस्तावांपैकी ९८.८१ टक्के अर्जांना मंजुरी देण्यात आली.
वसई आणि तलासरी तालुक्यातील सर्वाधिक १०० टक्के प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘घरकुल लाभार्थी संवाद अभियान’ राबवले जाणार आहे. ‘स्वप्न घरकुलाचे, साथ शासनाची’ या ध्येयाने प्रेरित हे अभियान २० मार्चला पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकाचवेळी आयोजित केले जाणार आहे. या मोहिमेद्वारे लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्वरित निराकरण करणे आणि घरकुल पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे हा उद्देश ठेवण्यात आला आहे. तसेच, पूरक योजनांची माहिती देऊन लाभार्थ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यात हक्काच्या घराशिवाय कोणीही नागरिक राहणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. गुरुवारी (ता. २०) राबवण्यात येणाऱ्या विशेष अभियानामुळे घरकुल बांधणीला गती मिळेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला.
तालुकानिहाय अर्जांची आकडेवारी
तालुका प्रस्ताव मंजूर अर्ज टक्केवारी
डहाणू १५,९७६ १५,६५३ ९७.९८
जव्हार ११,६९४ ११, ५८८ ९९.०९
तलासरी ५,०१४ ५,०१४ १००
वसई १,१३१ १,१३१ १००
विक्रमगड ८,४८६ ८,३७५ ९८.५५
वाडा ६,८०३ ६,७७८ ९९.६२
मोखाडा ५,७९१ ५,७०६ ९८
पालघर ६,०१८ ५,९६० ९८
उन्हाळी कांद्याची साठवण
उन्हाळी कांदा हा आठ महिने टिकण्याची क्षमता असल्याने मोठे व्यापारी उन्हाळी कांदा स्वस्त किमतीमध्ये घेऊन साठवण करून ठेवतात. यासाठी तेच व्यापारी कांद्याची किंमत कमी करून शेतकऱ्याकडून माल विकत घेतात. वर्षभरात शेतकरी तीन वेळा कांदा उत्पादन घेत असतात; मात्र हिवाळी कांदा हा टिकण्याची क्षमता कमी आणि त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा साठवण करू शकत नाही.
शेतकरी चिंतेत
दररोज किमती कमी होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.आठवडाभरात आठ ते दहा रुपयांनी प्रतिकिलो भाव कमी होत असून, आणखी आवक वाढल्यास आगामी काळात कांद्याचे भाव आणखी कमी येण्याची शक्यता आहे. भविष्यात कांद्याचे भाव गडगडल्यास शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.