Paisewari Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paisewari : नांदेडला खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर

Kharif Season : जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी सोमवारी (ता. ३० सप्टेंबर) जाहीर झाली. यात जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४९.४२ पैसे जाहीर झाली आहे. यात सहा तालुक्याची पैसेवारी पन्नास पैशाच्यावर तर दहा तालुक्याची पैसेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर करुन जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यानंतर सुधारित तसेच अंतिम पैसेवारीनंतर पिकांची परिस्थिती लक्षात येईल.

जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो. जिल्ह्यात असलेल्या एक हजार ५५५ गावात आठ लाख ५० हजार २९० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यापैकी यंदा सात लाख ९७ हजार ४६२ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली आहे.

या पेरणीक्षेत्रात पेरलेल्या पिकांच्या परिस्थितीचा अंदाज ता. ३० सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या हंगामी नजरी पैसेवारीवरुन व्यक्त करण्यात आला होता. यात १० तालुक्यांची पैसेवारी पन्नासपैशाच्या आत तर उर्वरित सहा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्याच्या वर जाहीर झाली आहे. तर जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४९.६२ पैसे असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विभागीय आयुक्तांना कळविले आहे.

यानंतर सुधारित अंदाज ता. ३१ आक्टोबर रोजी जाहीर होईल. १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर पिकांची परिस्थिती लक्षात येईल. खरिपातील हंगामी पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी करुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यानंतर सुधारित तसेच अंतिम पैसेवारीनंतर कृषी, महसूल व ग्रामविकास यंत्रणेच्या संयुक्तीक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेकडे शेतकऱ्यांचे लक्ष असेल.

तालुकानिहाय पैसेवारी जाहीर झालेली गावे (कंसात पैसेवारी)

नांदेड ८७ (५२), अर्धापूर ६४ (४८), कंधार १२६ (४८), लोहा १२६ (४७), भोकर ७९ (४९), मुदखेड ५४ (५१), हदगाव १३७ (४९), हिमायतनगर ६४ (४८), किनवट १९१ (४८), माहूर ८४ (५२.२५), देगलूर १०८ (५२), मुखेड १३५ (५२), बिलोली ९२ (४४.५), नायगाव ८९ (५२), धर्माबाद ५६ (४९), उमरी ६३ (४९). (नांदेड तालुक्यातील १७ गावांचे नागरिकरण झाले आहे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Disease : कांदा पिकावर करपा, पिळरोगाचा प्रादुर्भाव

Strawberry Cultivation : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून ‘गोकुळ श्री’ स्पर्धा, पहिलं बक्षिस ३५ हजार

Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले

SCROLL FOR NEXT