Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : मजुरांअभावी भातकापणी उरण तालुक्यात खोळंबली

Labor Shortage : उरण तालुक्यात विशेषकरून पूर्व विभागात शेतकऱ्यांना भातपीक कापण्यासाठी मोठी मजुरी देऊनही मजुरांचा अभाव भासू लागला आहे.

Team Agrowon

Raigad News : उरण तालुक्यात विशेषकरून पूर्व विभागात शेतकऱ्यांना भातपीक कापण्यासाठी मोठी मजुरी देऊनही मजुरांचा अभाव भासू लागला आहे. मजुरांअभावी भातपिकांची कापणी वेळेवर होत नसल्यामुळे येथील शेतकरी चिंतातूर झाला आहे.

निसर्गचक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्‍याने शेतकरीवर्गात नाराजी पसरली होती, मात्र आता उरलेल्या भातपिकाच्‍या कापणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे, परंतु भातकापणीकरिता मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

त्‍यामुळे नाइलाजाने शेतकरी कुटुंबातील नातेवाइकांच्या मदतीने भातकापणी करू लागले आहेत. भातकापणी झाल्यानंतर भातपिकांची आरवे चार दिवस चांगली वाळल्यानंतर त्याचे भारे बांधून ते उडव्यात रचून ठेवले जातात.

त्यानंतर शेतातच खला तयार करून त्याचे व्यवस्थित शेणाने सारवण करून त्यानंतर मळणी प्रक्रिया केली जात होती, परंतु सध्याच्या लहरी पावसाच्या भीतीने वर्षभर केलेले कष्ट व त्यासाठी केलेला अमाप खर्च वाया जाऊ नये म्हणून शेतकरी भातपीक न वाळवताच व त्याची साठवणूक न करताच ताबडतोब ताडपत्रीवर झोडून करून भात घरी आणत आहेत.

उरण तालुका हे भाताचे कोठार समजले जाते, परंतु मागील काही वर्षांपासून शेती व शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून नुकसान होत होत. त्यातच भातशेती ही पूर्णता: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओला, तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी लागवाडीखाली न आणता त्या ओसाड ठेवल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Crop Survey: पीक पाहणी’चे कवित्व कधी संपणार?

Political Warning: फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास गंभीर परिणाम : नितेश राणे

Turmeric Conference: शेतकरी संघटनेची गुरुवारी वसमत येथे हळद परिषद

Land Acquisition: विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन क्षेत्र ४० टक्क्यांनी कपात

Pune Heavy Rain: मुसळधार पावसामुळे भातरोपे तरारली

SCROLL FOR NEXT