Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : मुरूड तालुक्यात भातकापणी पूर्ण

Paddy Crop Update : मुरुड तालुक्यातील भातकापणीची कामे पूर्ण झाली आहे. झोडणी, मळणीची कामेही संपत आली. आता थंडीला सुरुवात झाल्याने शेतकरी भातकापणीनंतर कडवे वाल, चवळी, मूग आदी कडधान्य पेरणीत व्यग्र झाले आहेत.

Team Agrowon

Murud News : मुरुड तालुक्यातील भातकापणीची कामे पूर्ण झाली आहे. झोडणी, मळणीची कामेही संपत आली. आता थंडीला सुरुवात झाल्याने शेतकरी भातकापणीनंतर कडवे वाल, चवळी, मूग आदी कडधान्य पेरणीत व्यग्र झाले आहेत.

पूर्वी नातेवाईक तथा कुटुंबातील सदस्य कापणी, बांधणी व उडवे रचण्यासाठी परस्पर सहकार्य करायचे, त्याला ग्रामीण भाषेत ‘पटेल’ असे बोलतात. सद्यस्थितीत रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे मुंबईनगरीत स्थलांतरित झाल्याने मजुरांची आवश्‍यकता भासत आहे. मुरूड तालुक्यात भातलागवड योग्य क्षेत्र ३३०० हेक्टर आहे.

प्रत्यक्षात मात्र ३१०० हे. क्षेत्रावर लागवड झाली आहे. यंदा सरासरी २९०० मि.मी. पर्जन्य झाल्याने भातपिकाचे उत्पादन चांगले मिळणार आहे. गेल्या पंधरवड्यात उखारू जमिनीवरील हळव्या भाताची कापणी, झोडणीचे काम पूर्ण झाले आहे. तर खारपट्ट्यातील खोलगट भागातील गरवे भातकापणीला आठ दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. जवळजवळ भातकापणी पूर्ण झाली आहे.

न परवडणारी भातशेती

भातशेतीला लागवडपूर्व व नंतर मशागत, बियाणे, खते, मजुरी आदीचा विचार करता ती परवडत नसल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. भातकापणीसाठी पुरुषाला ५०० ते ५५० मजुरी, तर महिलेला ३५० रुपये द्यावे लागतात. यापूर्वी भातविक्रीसाठी रोहा तालुक्यात जावे लागत होते; मात्र तीन वर्षांपासून मुरूड तालुक्यात पणन विभागातर्फे सरकार भातखरेदी करत आहे.

प्रतिक्विंटल भाताला २०४० रुपये इतका हमी भावही देण्यात येतो. मात्र, दोन वर्षांपासून सरकारतर्फे बोनस देय असूनही मिळत नसल्याची तक्रार आहे. सरकारने हमी भाव देऊ केला असला, तरीही भातलागवड क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे.

भातलागवड क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागाने शेतकरी वर्गासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना आधुनिक शेती तंत्राचे धडे देण्याची गरज आहे. कडवे वालाचे उत्पादन खारपट्ट्यात चांगल्या प्रकारे होते. पोपटी प्रकारामध्ये कडव्या वालांना विशेष मागणी आहे. शिवाय मुंबई, पुणे येथील ग्राहक आवर्जून ते खरेदी करतात. अत्यल्प भू-धारकांना यासाठी विशेष अनुदान प्रोत्साहन म्हणून द्यावे.
मनोज कमाने, शेतकरी, खार अंबोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation: रब्बीसाठी प्रकल्पांतून मिळणार पाणी

Agriculture Relief Funds: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळाली १९१ कोटींची मदत

Farmer Subsidy Challenges: गेवराईतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कसे?

Bihar Election 2025: संकेत आणि संदेश

Interview with Dr Subhas Puri: कृषी विद्यापीठांमध्ये आमूलाग्र बदलांची आवश्यकता

SCROLL FOR NEXT