Rice Harvesting : भातकापणी, झोडणीच्या कामांना वेग

Rice Farming : वाढती मजुरी व मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागले आहेत.
Rice harvest
Rice harvestAgrowon
Published on
Updated on

Pali News : जिल्ह्यात सध्या भात कापणीची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला असला तरी सध्या पीक चांगले बहरले आहे. वाढती मजुरी व मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागले आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुणांचाही सहभाग कामादरम्‍यान शेतात गमतीजमती, गाणी, स्‍नेहभोजनाचे आयोजन केले जात आहे.

नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात गेलेले तरुण सुटी काढून खास शेतीच्या कामाला गावी येतात. अनेक शेतकरी आधुनिक शेतीवर भर देत असून नवनवीन प्रयोग करीत आहेत. त्‍यामुळे सुशिक्षित तरुणही पुन्हा शेतीकडे वळू लागला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अवकाळी पाऊस व बदलत्‍या हवामानाचा फटका बसू नये म्‍हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे कामे आटपून घेत आहेत. कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या वापराने कामे जलदगतीने करून घेत आहेत. तर बहुतांश ठिकाणी अद्यापही पारंपरिक पद्धतीने कापणी, झोडणीची कामे सुरू झाली आहेत. तापमान वाढू लागल्‍याने भल्या पहाटे शेतकरी व शेतमजूर शेतात दाखल होत आहेत. भात कापणी, वाळवणे, पेंढ्याची उडवी रचणे आदी कामांना सध्या वेग आला आहे.

Rice harvest
Drought Condition : राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर

खळ्यांवर झोडणी

ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होतात. खळ्यांमध्ये पडलेला भात पोत्यात भरून घरात व गोदामात ठेवला जात आहे. या कामात घरातील सर्व सदस्‍य सहभागी होत असून काही ठिकाणी आप्तस्‍वकीय, मित्रमंडळींची मदत घेतली जात आहे.

Rice harvest
Paddy Harvesting Implements : भात कापणी, काढणीपश्‍चात कामांसाठी यंत्रे

मासळीवर ताव

सध्या शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. खाडी, नदी, व तळ्याच्या शेजारी शेती असल्यास ताजी मासळी पकडून यथेच्छ स्‍नेहभोजनाचे बेत आखले जातात. काही ठिकाणी लोकगीते गायली जातात. तर तरुण मंडळी चित्रपटांची गाणी गात धमाल करीत कापणी, झोडणीची कामे करीत असल्‍याचे अलिबाग येथील शेतकरी ॲड. राकेश पाटील यांनी सांगितले.

महागाई वाढल्‍याने मजुरीचे दरही वाढले आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांना हे दर परवडणारे नसल्याने कुटुंबातील सदस्‍यांसह नातेवाईक, मित्रमंडळींच्या मदतीने कापणी, झोडणीची कामे करीत आहेत.
- राम तुपे, शेतकरी, कोंडगाव
घर, समाजकार्य, व्यवसाय सांभाळून सहकुटुंब शेतीची कामे करते. मुलेही शेताची सर्व कामे आनंदाने करतात. यामुळे पुढील पिढीला शेतीबद्दल आत्मीयता निर्माण होते. यातून भविष्‍यात आपली शेती टिकवण्यासाठी ते प्रयत्न करतील.
- निहारिका नीलेश शिर्के, पुरस्कारप्राप्त महिला शेतकरी, पुई-सुधागड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com