Paddy Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात भात कापणीला प्रारंभ

Paddy Crop : सध्या जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे. तरीदेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातपीक कापणीला सुरुवात केली आहे. सकाळच्या सत्रात भातपीक कापणी करून दुपारपर्यंत कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील ७५ टक्के भातपीक परिपक्व झाले असून शेतकऱ्यांनी कापणीला प्रारंभ केला आहे. सायकांळी पाऊस पडत असल्यामुळे सकाळच्या सत्रातच भातपीक कापणी केली जात आहे.

जिल्ह्यात यावर्षी ६२ हजार हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आले आहे. यामध्ये ५ टक्के हळव्या बियाण्यांच्या लागवडीचा समावेश आहे. ही पिके २० ते २५ दिवसांपूर्वीच परिपक्व झालेली आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लागवड केलेली पिकेदेखील परिपक्व स्थितीत आहेत.

साधारणपणे ७५ टक्के भातपीक परिपक्व असून कापणीयोग्य आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे. तरीदेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातपीक कापणीला सुरुवात केली आहे. सकाळच्या सत्रात भातपीक कापणी करून दुपारपर्यंत कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवले जाते.

त्याच ठिकाणी त्या पिकांची झोडणी केली जात आहे. दुपारनंतर कोणत्याही क्षणी पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या शक्य आहे. तेवढ्याच क्षेत्रावरील पिकांची कापणी सुरू ठेवली आहे. काही मोजक्याच शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली आहे.

बहुतांश शेतकरी नवरात्रोत्सवानंतर कापणीला सुरुवात करण्याचा अंदाज आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यातील भात कापणी अनिवार्य बनली आहे. पावसामुळे पीक नुकसानीची शक्यता असल्यामुळे पिकांची कापणी सुरू केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT