Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : भात रोपवाटिकेच्या कामांना पुणे जिल्ह्यात वेग

Paddy crop : जिल्ह्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडत आहे. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली असून, जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune Paddy Farming Update : जिल्ह्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडत आहे. शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली असून, जिल्ह्यात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्यात भात रोपवाटिकेची (Paddy Nursery) कामे सुरू झाली आहेत. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास वेळेवर पेरण्या होण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात खरिपाची दोन लाख सात हजार २५० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्‍चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांत प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते.

पूर्वेकडील शिरूर, दौंड, पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्यांत सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात. यंदा चांगल्या पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या केंद्रातून निविष्ठा नाममात्र दरात उपलब्ध होणार आहे.

पश्‍चिम पट्ट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे.

त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणाऱ्या रोपवाटिकांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ शेतकरी घेत असून, रोपवाटिकेची कामे सुरू केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याची कामे सुरू झाली आहेत.

पूर्वेकडील भागातही मशागतीची कामे सुरू आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी ऊस लागवडीची पूर्वतयारी शेतकरी करीत आहेत. याविषयी मावळ तालुक्यातील चांदखेड येथील नितीन गायकवाड म्हणाले, की सध्या पाऊस नाही, पेरणीसाठी पावसाची वाट पाहत असून अत्यंत गरज आहे.

काही शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकेच्या कामांना सुरुवात केली आहे.
‘‘सध्या माझ्याकडे एकूण साडेआठ एकर शेती आहे. सध्या एक एकर फळबाग आहे. खरिपात भाताची तीन एकरांवर लागवड करणार आहे. मशागतीची कामे सुरू आहेत. भात रोपे तयार करण्याचे कामे सुरू आहे,’’ मावळातील चांदखेड येथील नितीन गायकवाड यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात
भाताचे सरासरी क्षेत्र - ५९,६२७ हेक्टर
गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेली भात पेरणी -- ५८,७७७
यंदा भात लागवडीचे नियोजन -- ६०,२००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT