Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : पावसामुळे तळामध्ये भात जमीनदोस्त

Heavy Rain crop Loss : या पिकांची पाहणी, पंचनामा होऊन शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.

Team Agrowon

Tala News : सध्या भातपिकासाठी पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे भातपीक चांगले बहरले होते, मात्र आता भातकापणीच्या वेळेत पाऊस झाल्याने हाता-तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

या पिकांची पाहणी, पंचनामा होऊन शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे. या गेल्या पाच वर्षांत जंगलात माकडे, डुकरे यांचा उपद्रवसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

त्यामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकरी भातपीक २५ टक्के घेतात, मात्र त्यातही जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

दसरा, कोजागरी पौर्णिमा झाली, परंतु पाऊस काही पूर्ण गेला नसल्यामुळे आता शेतकरी बांधवांनी करायचे काय, असा सवाल येथील भात उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

पंचनामा करा

पीक विमा उतरवण्यात आला आहे. शेतकरी बांधवांना नुकसान झाल्यास विमा कंपनी प्रतिनिधीला ७२ तासांत कळविणे बंधनकारक आहे. त्यामुळे शेतीच्या नुकसानीचा फोटो काढून महसूल व कृषी यंत्रणांकडून पंचनामा केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT