Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : रत्नागिरीत भात पीक झाले आडवे

Rain Update : हवामान विभागाने दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार मंगळवारी (ता. ७) सायंकाळपासूनच हलके वारे वाहत होते.

Team Agrowon

Ratnagiri News : जिल्ह्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामुळे कापलेले भात ओलेचिंब झाले असून काही ठिकाणी उभे भात पीक आडवे झाले. बुधवारी (ता. ८) दिवसभर ढगाळ वातावरणामुळे भात सुकवणे शक्य झालेले नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील भाताचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हवामान विभागाने दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार मंगळवारी (ता. ७) सायंकाळपासूनच हलके वारे वाहत होते. मध्यरात्री ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.

पहाटेपर्यंत पावसाचा धुमाकूळ सुरूच होता. ठिकठिकाणी पाणीही साचलेले होते. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात भात कापणीच्या कामांना वेग आला आहे. उशिराने होणारे भात बियाणे कापणी योग्य झाले आहे.

यंदा जिल्ह्यात सुमारे ४७ हजार हेक्टरवर भात लावण्या झाल्या आहेत. त्यातील १० हजार हेक्टरवर हळवी (लवकर तयार होणारी) बियाणे होते. उर्वरित निमगरवी (मध्यम) आणि गरवी (उशिराने) बियाण्यांचे क्षेत्र आहे.

उशिराने तयार होणाऱ्या भाताची कापणी सुरू झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात पावसाने दणका दिला. रत्नागिरीतील काजरघाटी परिसरात काजळी खाडीच्या किनारी भागात पावसाचे पाणी भातशेतीमध्ये साचून राहिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT