Paddy Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Forecast : कोकणात पावसाचा अंदाज; भात, नाचणी उत्पादकांना धास्ती

Paddy Harvesting : आतापर्यंत जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांची कापणी पूर्ण झाली आहे तर नाचणी पीक काढणीला नुकतीच सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : कोकणात गुरुवारी (ता. १४) व शुक्रवारी (ता. १५) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असून पावसाच्या शक्यतेने भात पीक, नाचणी उत्पादकांसह आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत.

जिल्ह्यात ३ नोव्हेंबरला हलका पाऊस झाला होता. त्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबला. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात, नाचणी पीक काढणीवर लक्ष केंद्रीत केले. आतापर्यंत जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांची कापणी पूर्ण झाली आहे.

तर नाचणी पीक काढणीला नुकतीच सुरुवात झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात त्याचा परिणाम जाणवणार असल्याचा अंदाज दिला असून कोकणात १४ व १५ रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जिल्ह्यात १४ आणि १५ नोव्हेंबरला पावसाची शक्यता आहे. हा पाऊस दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात, नाचणी पिकाची कापणी सकाळच्या सत्रात करून कापणी केलेल्या पिकांची बांधणी दुपारपर्यंत करावी. पिकांची झोडणी शक्य नसल्यास शेतकऱ्यांनी कापणी केलेले पीक सुरक्षित स्थळी ठेवावे.
- डॉ. पी. सी. माळी, प्रमुख, ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marine Product Exports : भारत कृषी आणि सागरी उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश होईल; केंद्रीय वाणिज्यमंत्र्यांचा विश्वास

MGNREGA Scheme: रोजगार हमी योजनेतील गोंधळ थांबविण्याची मागणी

Ai Conference: ‘एआय’ परिषदेत सात कोटी कशावर खर्च केले?

Panchayat Samiti Chairman: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा पंचायत समिती सभापती भाजपाचे

Congress Protest: 'सरेंडर दे सिलिंडर'; गॅसचं पोस्टर घेऊन पटोले, वडेट्टीवार विधानभवनात

SCROLL FOR NEXT