Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप २०२४-२५ मध्ये परभणी जिल्ह्यातील ७ लाख ६४ हजार ३१२ शेतकऱ्यांना विविध जोखीम बाबी अंतर्गत ४४३ कोटी ५१ लाख रुपये पीकविमा मंजूर असून त्यापैकी ७ लाख ५२ हजार ४४७ शेतकऱ्यांना ४१८ कोटी ३० लाख रुपये पीकविमा खात्यावर जमा करण्यात आला.
परंतु आधार क्रमांक असत्यापित (अनव्हेरिफाइड) असणे आणि पीकविमा रक्कम १ हजार रुपयांपेक्षा कमी असणे या कारणांमुळे २ हजार ८९४ शेतकऱ्यांना पीकविम्याची १ कोटी ८ लाख रुपये एवढी रक्कम वाटप करणे प्रलंबित आहे. संबंधित शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करून घेणे आवश्यक आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे.
खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या जोखीमबाबीअंतर्गत सोयाबीन,कापूस,तूर या पिकांसाठी ६ लाख ७३ हजार २ शेतकऱ्यांना २९९ कोटी २४ लाख रुपये पीकविमा मंजूर असून ६ लाख ७० हजार ७४५ शेतकऱ्यांना २९८ कोटी ७८ लाख रुपये वाटप झाले. परंतु १ हजार रुपयेपेक्षा कमी रक्कम असल्यामुळे २ हजार २५७ शेतकऱ्यांचे ४६ लाख रुपये वाटप प्रलंबित आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलेमिटीज) या जोखीमबाबीअंतर्गत ५६ हजार ९६२ शेतकऱ्यांना ११७ कोटी ४५ लाख रुपये पीकविमा मंजूर असून ५६ हजार ६१० शेतकऱ्यांना ११६ कोटी ८५ लाख रुपये वाटप झाले. परंतु १ हजार रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे ३५२ शेतकऱ्यांच्या ६० लाख रुपये पीकविम्याचे वाटप प्रलंबित आहे.
विस्तृत प्रमाणातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती (वाईड स्प्रेड नॅचरल कॅलेमिटी-डब्लू.एस.एल.) याबाबीअंतर्गत २५ हजार ३७७ शेतकऱ्यांना २ कोटी ६९ लाख कोटी रक्कम मंजूर असून २५ हजार ९२ शेतकऱ्यांना २ कोटी ६७ लाख रुपये वाटप करण्यात आले.
परंतु १ हजार रुपयेपेक्षा कमी असल्यामुळे २८५ शेतकऱ्यांची २ लाख रुपयाचे वाटप प्रलंबित आहे. काढणी पश्चात (पोस्ट हार्वेस्टीग) या जोखीमबाबी अंतर्गत ९ हजार ३२३ शेतकऱ्यांना २४ कोटी १३ लाख रुपये पीकविमा मंजूर आहे.
बुधवारी (ता.९) काढण्यात आलेल्या शासननिर्णयानुसार पीकविमा कंपनीस १२३ कोटी ७० लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले.त्यामुळे पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पीक विमा कंपनीव्दारे सुरु करण्यात आलेली आहे.
रब्बी हंगाम २०२४-२५ मधील स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलेमिटीज) या बाबीअंतर्गत १ हजार ३५७ शेतकऱ्यांना २ कोटी ८ लाख रुपये पीकविमा रक्कम मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी १ हजार ३३३ शेतकऱ्यांना २ कोटी ७ लाख रुपये वाटप करण्यात आले.२४ शेतकऱ्यांची १ लाख रुपये वाटपप्रलंबित आहे.
७ हजार ९११ तक्रारी स्वीकारणार...
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेत ७ मे रोजी व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेत ४ जूनच्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार खरीप हंगामात प्राप्त झालेल्या एकूण ७ हजार ९११ तक्रारी स्वीकारून संबंधित लाभार्थ्यांना १७ कोटी ६२ लाख रुपये वाटप करण्याचे पीक विमा कंपनीने मान्य केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.