Kisan Samman Nidhi Agrowon
ॲग्रो विशेष

Kisan Samman Nidhi: किसान सन्मानचे ११ हजार लाभार्थी

Agriculture Support: जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांचा सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकास होऊ लागला आहे. यामध्ये पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचा समावेश आहे.

Team Agrowon

Javhar News: जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांचा सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक विकास होऊ लागला आहे. यामध्ये पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचा समावेश आहे. जव्हारमधील ११ हजार ७५५ शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार असे एकूण दोन कोटी ३५ लाख १० हजार रुपये डीबीटीद्वारे बँक अगर टपाल खात्यात जमा झाल्याची माहिती जव्हार तालुका कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.

पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत तालुक्यातील ११ हजार ७५५ शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारकडून अनुदान जमा करण्यात आले आहे. ही रक्कम दर तिमाहीला मिळणाऱ्या हप्त्याचा एक भाग असून, हा निधी शेतकरी कुटुंबासाठी आर्थिक आधार ठरत आहे.

या योजनेसाठी तालुक्यातील एकूण १२ हजार ७८१ शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी एक हजार २६ शेतकरी अपात्र ठरले आहेत, यात मृत ६३९, आधार लिंक नसणारे ३८७ अर्जदारांचा समावेश आहे. उर्वरित ३८७ शेतकरी काही कारणांमुळे या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत.

वंचित शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी

३८७ शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांचे खाते निष्क्रिय ठेवण्यात आले आहे. काही शेतकरी हे पती-पत्नी दोघांच्या नावावर एकाच वेळी अनुदान घेतले जात असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे अनुदान रोखण्यात आले आहे. सरकारच्या नियमांनुसार एका कुटुंबात केवळ एक सदस्य या योजनेला पात्र ठरतो, अशी माहिती पंतप्रधान किसान सन्मान योजना विभागातून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT