Vidhansabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election : राज्यात ७९९५ उमेदवारांचे १० हजारांवर अर्ज दाखल

Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या २८८ मतदार संघांसाठी निवडणुकीकरिता मंगळवारपर्यंत (ता. २९) म्हणजेच अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

Team Agrowon

Mumbai News : विधानसभेच्या २८८ मतदार संघांसाठी निवडणुकीकरिता मंगळवारपर्यंत (ता. २९) म्हणजेच अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी होऊन ४ नोव्हेंबरपर्यंत माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्यात महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचा शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गट अशी लढत होणार आहे.

या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना पक्षांचे अनेक पर्याय असल्यामुळे पक्षांतर मोठ्या प्रमाणात झाले तसेच सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी ही वाढली आहे. त्यामुळे अर्ज माघारीसाठी आता सहाही पक्षांना इच्छुकांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार आहेत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी तसेच आमदार बच्चू कडू, माजी खासदार संभाजी राजे आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही तिसरा पर्याय दिला आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबरपासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. मंगळवारी (ता. २९) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया बुधवारी (ता. ३०) सुरू होती.

४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येतील. मतदान २० नोव्हेंबरला होत असून, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT