PDCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

PDCC Bank : संस्थांनी व्यवसाय विकास आराखडा हाती घेणे गरजेचे

Team Agrowon

Pune News : आपण ज्या ठिकाणी अर्थपुरवठा करतो, त्या ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी फक्त कर्ज वितरणाचे काम न करता वसुलीचे काम केले पाहिजे. याबरोबरच या संस्थांचा किमान पुढचा तीन ते पाच वर्षांचा व्यवसाय विकास आराखडा हाती घेणे अत्यंत गरजेचे आहे. आराखडा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष उतरला पाहिजे. या पद्धतीने त्याचा प्रत्यक्ष पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे मतm राज्याचे सहकारी संस्थांचे माजी अप्पर आयुक्त शैलेश कोथमिरे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने हवेली तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण समारंभ रविवारी (ता. ६) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कोथमिरे बोलत होते.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक सुरेश घुले, विकास दांगट, प्रवीण शिंदे, प्रदीप कंद, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंदरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्रचार्य वांजळे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय पायगुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, आदी उपस्थित होते. या वेळी हवेली तालुक्यातील १६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना प्रोत्साहनपर बक्षीस वितरण करण्यात आले. चेअरमन, सचिवांना प्रत्येकी पाच हजार रुपये व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते.

प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, ‘‘सहकारी संस्था म्हणजे एक पत असते. अनेक जण एकत्रित येऊन ही संस्था सुरू करता येते. कॉर्पोरेट संस्था लगेच मोठ्या होतात. पण सहकारी संस्था लगेच तोट्यात जात नाहीत. हा मोठा फरक असून सहकारी संस्था या कॉर्पोरेटपेक्षा मोठ्या होऊ शकत नाहीत. विविध कार्यकारी सोसायट्या या विविध कार्य करत नाहीत. त्यामुळे त्या पुढे जात नाहीत. या संस्थांनी मूल्यवर्धन केले पाहिजे, तरच या संस्था पुढे जातील. याचा विचार संस्थानी केला पाहिजे. हवेलीतील संस्थाची वसुली चांगली आहे.’’

सुनील चांदेरे म्हणाले, ‘‘हवेली तालुक्यात नागरिकीकरण वाढत असताना सहकारी संस्थाचे महत्त्व कुठेही कमी झालेले नाही. तालुक्यात १३९ पैकी ३६ संस्था अनिष्ट तफावतीमध्ये मोडतात. तर अनिष्ट तफावत असलेल्या संस्थाना दहा लाख रुपयांचे कर्ज देऊन बाहेर काढण्याचे काम केले आहे. सहकारी संस्थाना केंद्र सरकारच्या माध्यमातून १५१ उद्योग हे सहकारी संस्थांना करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

बँकेच्या माध्यमातून पश्चिम पट्ट्यातील सहकारी संस्थांनी ७०० टन भात खरेदी करून विकला आहे. त्यामुळे संस्थांना ७० लाख रुपये अधिकची रक्कम मिळाली आहे. बँकेने शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्क्याने कर्ज देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे बळीराजा मुदती कर्ज योजना आणली असून त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. बँकेने अनेक कर्जाच्या नवीन योजना आणल्या असून शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज घ्या, वेळेत फेडा,’’ असे आवाहन त्यांनी केले. प्रवीण शिंदे यांनी प्रास्तविक केले. नरेश शिरसम यांनी आभार मानले.

जिल्हा परिषद शाळांना ५० हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत :

हवेली तालुक्यातील आर्वी, मन्यारवाडी, जांभळी, कुडजे, वरदाडे, रहाटवडे, कोंढणपूर-शिवभूमी विद्यालय, किंडन गार्डन-खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संगणक खरेदीसाठी ५० हजार रुपयांची मदत करण्यात करण्यात आली.

हवेली तालुक्यात जमिनीच्या रेडीरेकनरचे दर वाढत आहेत. त्यातुलनेत घेत असलेल्या कर्जाची रक्कम अत्यंत तुटपुंजी वाटते. त्यामुळे बँकेने येथील शेतकऱ्यांना अधिकचे कर्ज देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्याचा विचार सर्व संचालक मंडळाने करून सोसायटीने नवनवीन व्यवसायाची निवड केली पाहिजे.
- प्रदीप कंद, संचालक, पीडीसीसी बॅक, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Return Monsoon : राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; माॅन्सूनचा परतीचा प्रवास दोन दिवसांपासून पुन्हा थबकला

Soybean Crop Subsidy : सांगलीतील ३१ हजार सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांचे अनुदान

Pink Bollworm Infestation : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यात यश

Crop Damage : अठ्ठावन्न हजार हेक्टरवरील कपाशी, सोयाबीनला फटका

Chana Production : हरभरा उत्पादन वाढीची सूत्रे

SCROLL FOR NEXT