Agriculture Program Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Program : विद्यापीठामध्ये रब्बी बीजोत्पादन, पीकपाहणी कार्यक्रमाचे आयोजन

Seed Production and Crop Inspection Program : मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर कृषी विद्यापीठ, महाबीज व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने रब्बी बीजोत्पादन व पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापूर येथील मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर संशोधनासाठी सर्वाधिक जमीन उपलब्ध असून खरीप आणि रब्बी पिकांच्या बीजोत्पादनासाठी या प्रक्षेत्रावर मोठा वाव आहे, असे प्रतिपादन मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी केले.

मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर कृषी विद्यापीठ, महाबीज व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने रब्बी बीजोत्पादन व पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी तांत्रिक चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. गाव तेथे कृषी विद्यापीठ तंत्रज्ञान व पीक वाणांच्या प्रभावी वापरासाठी कृषी विभागासह इतर सर्व समांतर शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी, सेवाभावी संस्थांचे एकात्मिक प्रयत्नांची

भक्कम मोट बांधत सर्वार्थाने शाश्वत, आर्थिक तथा सामाजिकदृष्टया समृद्ध ग्राम निर्मिती साधत शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भाचा संकल्प कृतीत आणू असा आत्मविश्वास डॉ. गडाख यांनी व्यक्त केला. उद्घाटन सत्राला विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विठ्ठल सरप पाटील, वणीरंभापूरचे सरपंच अनिल डाबेराव, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे,

जिल्हाधिकारी अजित कुंभार, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, मुख्य बीज उत्पादन अधिकारी डॉ. ताराचंद राठोड, सहअधिकारी डॉ. परमेश्वर चव्हाण, महाबीजचे प्रफुल्ल लहाने, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, डॉ. शिवाजी नागपुरे, डॉ. प्रफुल्ल गावंडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

प्रास्ताविक डॉ. विलास खर्चे यांनी केले. डॉ. अर्चना थोरात, डॉ. सुहास लांडे, डॉ. बीना नायर, डॉ. संतोष गहूकर,डॉ. स्वाती भराड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर बिडवे यांनी केले. डॉ. ताराचंद राठोड यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahabeej Biofertilizers: जैविक निविष्ठांच्या विक्रीतून ‘महाबीज’ला २.३९ कोटींचा महसूल

Vidarbh Fuel Shortage: विदर्भात ऐन खरीप हंगामात डिझेल टंचाईचा फटका

Nanded Diesel Shortage: नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेल उपलब्धतेबाबत संभ्रम

Cotton, Soybean Rate: कापूस, सोयाबीनमधील तेजी टिकून तूर, मका हरभरा भाववाढीचे संकेत

Solapur Diesel Shortage: पेट्रोल-डिझेल टंचाईमुळे ग्रामीण भागातील मशागतीची कामे खोळंबली

SCROLL FOR NEXT