Soil Testing Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर अनिवार्य

Soil Fertility : रासायनिक खतांना पिकांचा प्रतिसाद कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर अनिवार्य आहे.

Team Agrowon

Parbhani News : रासायनिक खतांना पिकांचा प्रतिसाद कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय घटकांचा वापर अनिवार्य आहे. शाश्‍वत मृद्‍ व्यवस्थापनासाठी उपाययोजनाआवश्यक आहेत, असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. दीपक रंजन विश्‍वास यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, भारतीय मृदा शास्त्र संस्थेचा परभणी विभाग संयुक्त विद्यमाने “नैसर्गिक शेती व नवपिढी खतांद्वारे मृदा आरोग्य व्यवस्थापन” या विषयावर सोमवारी (ता. ४) डॉक्टर विश्‍वास यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा होते. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल विभागप्रमुख तथा पीसीआयएसएस अध्यक्ष डॉ. हरिहर कौसडीकर, उपाध्यक्ष डॉ. अनिल धमक, सल्लागार डॉ. रामप्रसाद खंदारे, सचिव डॉ. सुदाम शिराळे, संयुक्त आयोजक सचिव डॉ. संतोष चिकशे, कोषाध्यक्ष डॉ.भाग्यरेषा गजभिये, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. महेश देशमुख डॉ. स्वाती झाडे, डॉ. संतोष पिल्लेवाड उपस्थित होते.

डॉ. इंद्रमणी म्हणाले, की शाश्‍वत शेती आणि कृषी समृद्धीसाठी शुद्ध बियाणे आणि उत्तम मृदा आवश्यक आहे. ग्रीन हाउस व पॉली हाउस पद्धतीने शेती करताना देखील मृदेचीच आवश्यकता भासते. पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी संशोधनाचे विषय निवडताना, तसेच प्रभावी संशोधन करताना या ज्ञानाचा आधार घ्यावा.

डॉ. दीपक रंजन विश्‍वास म्हणाले, की शाश्‍वत मृद्‍ व्यवस्थापनासाठी त्यांनी जमिनीची धूप टाळणे, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवणे, पोषणचक्र व समतोल राखणे, क्षारता व अल्कलीनतेचे व्यवस्थापन करणे, मातीतील जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि जल व्यवस्थापनात सुधारणा करणे आवश्‍यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Crisis: पाण्याला सीमा नाही

White Grub Attack: हुमणीने पोखरले उसाचे उभे पीक

Farmer Aid: ‘पीएम केअर’मधून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी द्या : ठाकरे

Nanded Heavy Rainfall: नांदेडला पुन्हा जोरदार पावसाचा तडाखा

National Coconut Conference: गोव्यात १० ऑक्टोबरला राष्ट्रीय नारळ परिषद

SCROLL FOR NEXT