Agriculture Land Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Manure: पीक पोषणासाठी सेंद्रिय खते

Soil Nutrition: रासायनिक खतांवर पूर्ण अवलंबून राहण्याऐवजी शेतीमध्ये पीक अवशेष, शेणखत, कंपोस्ट व पेंड यांसारख्या सेंद्रिय खतांचा समावेश केल्यास मातीच्या सुपीकतेस चालना मिळते. अशा नैसर्गिक निविष्ठांचा वापर केल्याने जमिनीची पोत, पाणीधारण क्षमता आणि अन्नद्रव्य उपलब्धता सुधारते.

Team Agrowon

Natural Crop Fertilizer: जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकवण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. पीक काढणी पूर्ण झाल्यानंतर शेतामध्ये त्या पिकाचे अवशेष शिल्लक राहतात. बहुतांश ठिकाणी पीक अवशेष जाळले जातात.

Chart

मात्र त्यामुळे प्रदूषण होण्याची समस्या असते. या पीक अवशेषांचा योग्यप्रकारे जमिनीत गाडून किंवा त्यांचा आच्छादन म्हणून वापर करता येतो. त्यातून मातीची सुपीकता, पोषक तत्त्वे वाढवण्यासह अन्य फायदे होतात.

Chart

पेंडी खतातील अन्नद्रव्ये

तेलबियापासून तेल काढल्यानंतर तयार झालेल्या पेंडीचा वापर सेंद्रिय खत म्हणून करता येतो.

सेंद्रिय खत वापर

सेंद्रिय खतातील भर खते (शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत) पेरणीच्या १० ते १५ दिवस अगोदर जमिनीत मिसळून द्यावीत. तर जोरखते (पेंडी खते, प्राण्यांच्या अवशेष खते) पेरणी वेळेस किंवा पिकांच्या दोन ओळींत जमिनीत मिसळून द्यावीत. सेंद्रिय खतातील असलेल्या अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार पिकांच्या शिफारशीत खतमात्रेनुसार योग्य मात्रेत द्यावीत.

सेंद्रिय खताचे फायदे

सेंद्रिय खतांमुळे अन्नद्रव्ये पोषणाबरोबरच मातीचे कण एकमेकांस चिकटून राहतात.

जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते.

जमिनीत सच्छिद्रता वाढते. जमिनीची धूप टाळण्यास मदत होते.

जमिनीचा सामू नियंत्रित राखला जातो.

कर्बाचा पुरवठा होतो. त्यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते.

जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Oil Market: सणांमुळे खाद्यतेलाची आयात वाढणार; सोयातेलाची आयात विक्रमी पातळीवर 

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं दिवाळीनंतर वाजणार बिगुल

Farm Road Model : शेतरस्त्याचा औसा पॅटर्न आता राज्यभरात

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गात मुसळधार, तरीही सरासरीपेक्षा कमीच

Crop Insurance : कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

SCROLL FOR NEXT