Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : शेतीपिकांचे सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश

Kharif Crop : पुणे जिल्ह्यातील खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. पिकांची परिस्थिती जाणण्यासाठी कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

Team Agrowon

Pune News : पावसाळ्याच्या तीन महिन्यांच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ५४ महसूल मंडलांमध्ये पावसाचा खंड सुमारे २२ ते ३५ दिवसांचा झाला आहे. त्यामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. पिकांची परिस्थिती जाणण्यासाठी कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४५५ मिलिमीटर पाऊस झाला असून, सरासरी ६८४ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत हा पाऊस केवळ ६७ टक्केच आहे. पुरंदर तालुक्यात सर्वांत कमी ३८ टक्के पाऊस झाला असून हवेलीत ३९, तर बारामतीत केवळ ४० टक्के पाऊस झाला आहे. इंदापूर, दौंड, शिरूर या तालुक्यांतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पिकांची परिस्थिती जाणण्यासाठी कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या गावांमध्ये सर्वेक्षणाचे काम सुरू करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ही स्थिती पाहता पीकविमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Flour Export : केंद्र सरकार सेंद्रिय गव्हाच्या पीठ निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता

Bihar Government Formation: पुन्हा तेच त्रिकूट! बिहारचा मुख्यमंत्री ठरला; NDA सरकारमध्ये असणार दोन उपमुख्यमंत्री

Cotton Production Issue: कारंजा तालुक्यात कपाशीची दोन वेचणीतच उलंगवाडी

Local Body Polls: निवडणुकीत नेत्यांचा नातेवाईकांवरच विश्वास

Agriculture Storage: साठवणुकीत तापमान आणि आर्द्रता का महत्त्वाची?

SCROLL FOR NEXT