Pune Dam Water : पुण्यातील धरणक्षेत्रावरही दुष्काळाचे सावट

Pune Dam Water Level : गेल्या महिनाभरातही पाऊस न पडल्याने १८ धरणक्षेत्रांची पाणीपातळी खाली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.
Pune Dam
Pune DamAgrowon
Published on
Updated on

Pune Rain Update : पावसाचे जवळपास तीन महिने लोटले असून, या काळात जिल्ह्यातील धरणक्षेत्रात अजूनही दमदार पाऊस पडलेला नाही. गेल्या महिनाभरातही पाऊस न पडल्याने १८ धरणक्षेत्रांची पाणीपातळी खाली गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे भरतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य जाणवण्याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे.

Pune Dam
Pune Rain Update : पुणे दोन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ७६ टक्के पाऊस

जिल्ह्यात लहान मोठी मिळून २६ धरणे आहेत. यात उजनी धरणाचा समावेश आहे. मागील दोन महिन्यांत ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यांवर चांगला पाऊस झाला असून मुठा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. तर, नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रात कमी-अधिक जोर होता. कुकडी खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते. जिल्ह्यातील धरणाची एकूण क्षमता १९८.३४ टीएमसी असून त्यापैकी आत्तापर्यंत धरणांत अवघा १३२.५५ टीएमसी एवढा साठा झाला आहे. सरासरी धरणांत ६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात जिल्ह्यातील धरणांत एकूण १९७.६२ टीएमसी म्हणजेच ९९.६३

टक्के एवढा पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ६५.०७ टीएमसीने पाणीसाठा कमी झाला असल्याने अजूनही १८ धरणे शंभर टक्के भरलेली नाहीत. वरसगाव, पानशेत, पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, वडिवळे, नीरा देवघर ही धरणे शंभर टक्के भरली आहे. येत्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यास धरणे भरण्याची शक्यता कमी होणार असून भविष्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.

Pune Dam
Kharif Season : यंदाचा खरिप हंगाम धोक्यात, तुरळक पावसाने पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

हवामान विभागाकडून राज्यात मे महिन्यात ९७ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानंतर महिनानिहाय हवामान अंदाज वर्तविल्यानंतर जून आणि जुलै महिन्यांच्या अखेरीस चांगला पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच दडी मारली होती. आता सप्टेंबर महिना सुरू झाला असून दोन ते तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात काही ठिकाणी कमी-अधिक पाऊस पडला. त्यामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस पडला नसल्याचे चित्र होते.

त्यामुळे शेटफळ, नाझरे, येडगाव, घोड, विसापूर, उजनी या धरणांतील पाणीसाठा अजूनही ३० टक्क्यांच्या आत असून नाझरे धरण अजूनही कोरडेठाक आहे. तर टेमघर, खडकवासला, भामा आसखेड, आंध्रा, गुंजवणी, भाटघर, वीर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, मुळशी या धरणांत ५० ते ९७ टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील धरणनिहाय पाणीसाठा, टीएमसीमध्ये ( कंसात गेल्या वर्षीचा पाणीसाठा) :

टेमघर २.९७ (३.६६), वरसगाव १२.८२ (१२.८२), पानशेत १०.६५ (१०.६५), खडकवासला ०.९९ (१.९१), पवना ८.५१ (८.५१), कासारसाई ०.५७ (०.५७), कळमोडी १.५१ (१.५१),

चासकमान ७.५६ (७.५८), भामा आसखेड ६.८५ (७.४३), आंध्रा २.८६ (२.९२), वडीवळे १.०७ (१.०७), शेटफळ ०.०३(०.६२), नाझरे ०.०० (०.५९), गुंजवणी ३.३० ( ३.६४), भाटघर २२.३६ (२३.५१), निरा देवघर ११.६८ (११.७३), वीर ६.२७ (९.४१), पिंपळगाव जोगे २.५२ (३.५४), माणिकडोह ६.२७ (७.६४), येडगाव ०.३७ (१.४४), वडज १.०९ (१.०९), डिंभे ११.५८ (१२.१९), चिल्हेवाडी ०.५६ (०.७८), घोड १.१४ (४.६०), विसापूर ०.०७ (०.९०), उजनी ८.९३ (५७.३०), मुळशी १७.८३ (१९.२५)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com