Crop Damage Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : परभणीत पीक विमाभरपाईसाठी नमुना सर्वेक्षणाचे आदेश

Crop Damage Survey : स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबीअंतर्गत सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी पिकांच्या नुकसानीबद्दल पीकविमा परतावा मिळावा यासाठी जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांनी ७ लाख ३ हजार ३२१ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांत मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल नॅचरल कॅलेमिटी) या जोखीमबाबी अंतर्गत पीकविमा भरपाई मंजूर करण्यासाठी पीकनुकसान क्षेत्राचे नमुना सर्वेक्षण (सँपल सर्वे) करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले, असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीम बाबीअंतर्गत सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी पिकांच्या नुकसानीबद्दल पीकविमा परतावा मिळावा यासाठी जिल्ह्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांनी ७ लाख ३ हजार ३२१ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जर अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकाचे बाधित क्षेत्र हे एकूण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपर्यंत असेल, तर वैयक्तिक स्तरावर तसेच २० ते २५ टक्क्यांपर्यंत असेल तर एकूण प्राप्त तक्रारीच्या २५ टक्के व ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर एकूण प्राप्त तक्रारींच्या ३० टक्के असेल. जिल्हास्तरीय संयुक्त समितीने विमा कंपनीस सर्वेक्षण करण्यासाठी कळविण्याचे नमूद केलेले आहे.

एकूण प्राप्त तक्रारींची (पूर्वसूचना) संख्या पाहता जिल्ह्यातील सर्वच ५२ महसूल मंडल नमुना सर्वेक्षण (सँपल सर्वे)साठी पात्र आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पात्रता धारक एका महसूल मंडलामध्ये कमीत कमी १० लॉस असेसरची (नुकसान प्रगणक) नेमणूक करण्यात यावी.

सँपल सर्वेसाठी संबंधित गावाचा कृषी सहायक, विमा कंपनीचे प्रतिनिधी, स्थानिक शेतकरी प्रतिनिधी यांची उपसमिती स्थापन करावीत स्थानिक शेतकरी प्रतिनिधी मंडळ कृषी अधिकारी यांनी संनियंत्रण करून नमुद उपसमितीचा बाधित क्षेत्राची पाहणी करून अहवाल ७ दिवसांत सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT