Monsoon Alert  Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Back : दक्षिण कोकणात 'ऑरेंज अलर्ट' ; कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

Monsoon return journey : मध्य महाराष्ट्रात, कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

Team Agrowon

Monsoon update : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीचा प्रवास सुरू असतानाच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडयात मुसळधार वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २८) दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. मध्य महाराष्ट्रात, कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे.

उद्यापर्यंत (ता. २९) उत्तर अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. शनिवार पर्यंत (ता. ३०) या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, या प्रणाली पासून उत्तर कर्नाटक किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये, तसेच तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २८) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. विदर्भासह, उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनच्या परतीसाठी अनुकूल स्थिती

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली आहे. सोमवारी (ता. २५) मॉन्सूनने नैर्ऋत्य राजस्थानतील नौखरा, जोधपूर, बारमेर पर्यंतच्या भागातून काढता पाय घेतला आहे. दोन दिवसांत मॉन्सून परतीची वाटचाल जैसे थे आहे. अनुकुल स्थिती असल्याने दोन दिवसांत वायव्य आणि पश्चिम भारताच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Debt Crisis: शेतकरी सावकारी, मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात

Groundwater Report: भूजलपातळी वाढली, रब्बीला मिळणार आधार

Maharashtra Cold Weather: किमान तापमानात वाढ शक्य

Rabi Sowing: देशात रब्बी पेरणी क्षेत्रात आठ लाख हेक्टरने वाढ

Sugar Industry Awards: ऊस उत्पादनात काळे, लाड, नांगरे यांची बाजी

SCROLL FOR NEXT