Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : भात पीक नुकसान भरपाईसाठी जाचक अटी

Crop Damage : जिओटॅग फोटो बंधनकारक असल्याने शेतकरी नाराज

Team Agrowon

Paddy Crop Damage Compensation : वाडा : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनस्तरावरून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वारंवार करीत आहेत. याची दखल घेत ग्रामसेवकांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत; परंतु भरपाई मिळण्यासाठी जाचक अटी घातल्याने शेतकरीवर्ग हैराण झाला असून नाराजी व्यक्त करीत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या भातपिकाचे नुकसान सिद्ध करण्यासाठी शेतात उभे राहून जीपीएस मॅप कॅमेऱ्याद्वारे फोटो काढून शेतीचे ठिकाण सिद्ध होण्यासाठी जिओटॅग फोटो प्रिंट देणे बंधनकारक आहे.

त्यासोबत सात-बारा, आठ-अ, आधार कार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रे संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात सादर करायची आहेत. जिओटॅग फोटोची छपाई करण्यासाठी बहुतांशी शेतकऱ्यांजवळ स्मार्टफोन नसल्यामुळे अनेकांची धावपळ उडाली आहे. त्यामुळे जिओटॅग फोटो प्रिंट द्यायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. जिओटॅग फोटो प्रिंट काढण्यासाठी ४० ते ५० रुपये खर्च येतो. तसेच, संबंधित कागदपत्रांचे झेरॉक्स काढण्यासाठी पैसा व वेळ वाया घालवावा लागत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या भातपीक नुकसानीचे शासनस्तरावरून प्रत्यक्ष पाहणी व पंचनामेच होत नसल्याने संबंधित विभागातील अधिकारीच बेपत्ता झाल्याने शेतकरीवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी भरपाईच्या चिंतेत आहे. आता कागदपत्रांसाठी धावपळ सुरू असताना जिओटॅग फोटो प्रिंटची मागणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

- नितीन चौधरी, शेतकरी

शेतकऱ्यांच्या कसरती ग्रामीण भागात वीजपुरवठ्याची समस्या आहे. अनेकवेळा सेवा खंडित होत असल्याने जिओटॅग फोटोची छपाई करण्यासाठी वेळ वाया जात आहे. त्यामुळे छापील फोटो काढण्यासाठी शहरातील दुकानांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. अनेक शेतकऱ्यांना अॅप वापरण्याविषयी माहिती नसल्याने तरुणांच्या मदतीने फोटो काढून त्यांनाच त्याची छपाई करण्यासाठी सांगितले जाते. प्रशासनाने सेवा देण्यासाठी समस्यांमध्ये वाढ केल्याची भावना तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. या प्रकरणी कसरती थांबवण्यासाठी तत्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT