Mechanization Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Mechanization : ‘सिंधुरत्न’अंतर्गत शेतकरी गटांना कृषी यांत्रिकीकरणाची संधी

शासनाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना जाहीर केली होती. या योजनेची अमंलबजावणी आता सुरू झाली आहे.

Team Agrowon

Shindhudurg News : जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company) आणि नोंदणीकृत बचत गटांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणांसाठी ७५ टक्के अनुदानावर (Subsidy) योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेसाठी २ मार्चपर्यंत प्रस्ताव देण्यात यावेत, असे आवाहन कृषी विभागाकडून (Agricultural Department) करण्यात आले आहे.

शासनाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना जाहीर केली होती. या योजनेची अमंलबजावणी आता सुरू झाली आहे.

पहिल्या टप्प्यात कृषी यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला असून १० लाखांपर्यंत अनुदान शेतकरी गट किवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यात येणार आहे.

शासनाने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांसाठी सिंधुरत्न समृद्ध योजना जाहीर केली होती. या योजनेची अमंलबजावणी आता सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात कृषी यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला असून १० लाखांपर्यंत अनुदान शेतकरी गट किवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यात येणार आहे.

ट्रॅक्टर, पॉवर टिलर, भातलावणी यंत्र, स्वंयचलित पँडी ट्रान्सप्लांटर, स्वंयचलित यंत्रे, विविध क्षमतेची पॉवर बीडर, रोटाव्हेटर, विविध पीक संरक्षण उपकरणे, विविध प्रकारचे फवारणी पंप अशी शेकडो यंत्रे या योजनेतून खरेदी करता येणार आहेत.

या योजनेतून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ‘आत्मा’अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट, नोंदणीकृत बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका गटाला १० लाखांपर्यंत योजनेसाठी प्रस्ताव करता येणार आहे.

यंत्रे खरेदीनंतर अनुदानाची रक्कम शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ज्यांना या योजनेसाठी प्रस्ताव करावयाचे आहेत, अशा गटांनी २ मार्चपर्यंत कृषी विभागाकडे प्रस्ताव द्यावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT