Soybean MSP  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean MSP Center : सांगलीत सोयाबीन खरेदीची केवळ दोन हमीभाव केंद्रे मंजूर

MSP Scheme : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात फक्त २ केंद्रांना मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Sangli News : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात फक्त २ केंद्रांना मंजुरी दिली आहे. अनेक जाचक अटींमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने ही हमीभाव केंद्रे घेण्याकडे पाठ फिरवली आहे

२०२४-२५ हंगामातील सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रुपये सरकारने निश्चित केला. या हमीभावाने हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी करू असे जाहीर केले होते. ‘नाफेड’कडे ही केंद्रे मजुरीसाठी पाठवली. त्यात असलेल्या जाचक अटींमुळे ही खरेदी केंद्रे घेण्यास बाजार समित्यांनी असमर्थता दर्शविली.

या मध्ये प्रामुख्याने पाच आणि दहा लाख रुपये डिपॉझिट ठेवणे बंधनकारक करण्यात आले. पणनच्या अ वर्ग सभासद असणाऱ्या संस्थांना यामध्ये प्राधान्य होते. त्यांना डिपॉझिटची अट नव्हती. परंतु त्यांनीही यासाठी नकार दर्शविला आहे. सोयाबीन हमीभावाने घाला त्याशिवाय विक्री करू नका, असे सर्वजण सांगत होते. तासगाव येथील आर. आर. पाटील खरेदी विक्रीसंघ व सांगलीमधील विष्णू अण्णा पाटील खरेदी विक्री संघ या दोनच ठिकाणी ही हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली.

वास्तविक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही हमीभाव केंद्रे हवी होती. आता नाइलाजास्तव खासगी व्यापाऱ्याकडे शेतकऱ्याना जावे लागत आहे. हे व्यापारी मन मानेल त्या पद्धतीने ही खरेदी करत आहेत.वजन काटा आणि आर्द्रता तपासताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली जाते. ३८०० ते ४२०० रुपयेपर्यंत हे सोयाबीन खरेदी केले जाते यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे.

माल केंद्रावर आणावा

हमीभाव केंद्रावर विक्री करताना नोंदणीसाठी आधारकार्डची प्रत, राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते असलेल्या पासबुकची प्रत व सोयाबीन पिकाची नोंद असलेला ऑनलाइन पीक पेरा व चालू मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी काहीही कचरा नसलेला चाळणी करून, सुकवून माल केंद्रावर आणावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT