Jalgaon Apmc Election
Jalgaon Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Apmc Election : जो निधी आणेल, त्यालाच पॅनेलमध्ये स्थान

Team Agrowon

Jalgaon Apmc News : निवडणुका म्हटल्या म्हणजे, प्रचार, गटागट आणि भोजनाचे कार्यक्रम, शिवाय महत्त्वाच्या मंडळीची चांगली बडदास्तही आलीच. अर्थात, यासाठी निधीही अधिक लागतो. हा निधी जो उमेदवार मोकळ्या हाताने देईल, त्यालाच पॅनेलमध्ये स्थान मिळेल, अशी भूमिका नेत्यांनी देखील घेतली आहे.

निधीच्या आकड्यांची बोलीदेखील लागत आहे. सभापतिपदासाठी इच्छुकाकडून अधिकचा निधी गोळा करण्याचा बेतही नेत्यांचा आहे. यातच काही उमेदवार मात्र आताच पदाचे आश्‍वासन हवे, असा हट्ट करीत आहेत. यात नेत्यांची अडचणही होत आहे.

निवडणुका आता सोप्या नाहीत, मतदार हुशार आहे, त्याच्याकडे जाताना लक्ष्मीदर्शन घेऊन यावे लागते, निवडणुका खर्चिक आहेत. त्यातच सोसायट्यांचे संचालक अधिक चतुर असतात, असे मुद्दे नेते आपापल्या कार्यकर्त्यांना सांगून अधिकाधिक निधी कसा गोळा होईल आणि पुढे निवडणूक हातात येईल, याबाबत रणनीती आखत आहेत.

पाच वर्षांत पाच सभापती...

निधी गोळा करतानाच पाच वर्षांत पाच सभापती आणि पाच उपसभापती असतील, असा फॉर्म्यूलादेखील नेत्यांनी निश्‍चित केला आहे. कारण यामुळे १० जणांना पद निश्‍चित मिळेल, अशी शाश्‍वती येत आहे. पण सभापती पदासाठी निधीची मर्यादा अधिक आहे.

सुरुवातीलाच ज्यांना सभापतिपद हवे आहे, अशांकडून अधिकचा निधी घेतला जात आहे, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

निधी देणे परवडत नसल्याने काही उमेदवार किंवा इच्छुकांनी माघार घेण्याची तयारीदेखील केली आहे. कारण पराभूत झाल्यास किंवा बहुमत न आल्यास व्यवहार तोट्याचा होईल, अशी वजाबाकी काही उमेदवार करीत आहेत.

यामुळे अनेकांनी निवडणुकीपासून दूर राहणे पसंत केले आहे. नेते सांगतील, त्यांना सहकार्य करू, अशी भूमिकादेखील या मंडळीने जाहीर केली आहे.

जळगाव, अमळनेर, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा व नंदुरबार येथे आतापासून पॅनलअंतर्गत घोडेबाजार सुरू झाल्याची चर्चाही आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT