Solapur News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडील मालमत्ता कराची नोव्हेंबरअखेर थकबाकी व चालू मागणी अशी एकूण ३२ कोटी २८ लाख १४ हजार इतकी झाली आहे. त्याची टक्केवारी ६४.०९ इतकी आहे.
तर डिसेंबरअखेर ८१ टक्के करवसुली झाली असून, उर्वरित थकबाकी व चालू मागणी वसुलीसाठी शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.
जिल्ह्यात १ हजार २४ ग्रामपंचायती आहेत. त्यांच्याकडील मालमत्ता करापोटी ३१ मार्चअखेर ५ कोटी ४२ लाख ९९ हजारांची थकबाकी होती. तर ३१ मार्च २०२४ अखेर ६ कोटी ९० लाख ५९ हजार इतकी थकबाकी होती. थकबाकी व २०२४-२५ मधील चालू करमागणी अशी एकूण ५० कोटी ३७ लाख २४ हजारांची मागणी आहे.
त्यापैकी १६ कोटी ७७ लाख २७ हजारांची थकबाकी तर चालू मागणीपैकी ११ कोटी ४२ लाख ३४ हजारांची वसुली झाली आहे. नोव्हेंबरअखेर एकूण ३२ कोटी २८ लाख १४ हजारांची वसुली झाली आहे.
तालुकानिहाय मालमत्ता कर वसुलीची आकडेवारी (लाखांत)
अक्कलकोट ३८६.१४
बार्शी ३८८.२५
करमाळा ३२५.३
माढा ३७७.०८
माळशिरस ४४४.८८
मंगळवेढा २०१.०३
मोहोळ २२०.३६
पंढरपूर २५२.५४
सांगोला २०३.८४
उत्तर सोलापूर १९८.८९
दक्षिण सोलापूर २३०
एकूण ३२२८.१४
टक्केवारी ६४.०९ टक्के
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडील मालमत्ता कराची डिसेंबरअखेर ८१ टक्के वसुली झाली आहे. उर्वरित दोन महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी व मार्चमध्ये करवसुलीसाठी ग्रामपंचायतनिहाय शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. उर्वरित करवसुली पूर्ण करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- ईशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग,
जिल्हा परिषद, सोलापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.