Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Irrigation : शेतकरी, पाणीवापर संस्थांनी २८ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत

Agriculture Irrigation : पाणी पुरवठा करताना पाऊस कमी झाल्यास किंवा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास अथवा आपत्ती म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याची आवश्यकता भासल्यास अशावेळी दिलेले परवाने व मंजुरी रद्द करण्यात येईल

Team Agrowon

Nashik News : नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील दारणा, गंगापूर, गौतमी-गोदावरी, कश्यपी, आळंदी, कडवा, भोजापूर, भावली, मुकणे, वाकी, भाम व वालदेवी या सर्व प्रकल्पांवरील जलाशय नदी तसेच गोदावरी कालवे, गंगापूर डावा कालवा, कडवा उजवा कालवा, आळंदी उजवा व डावा कालवा, भोजापूर डावा कालावा,पालखेड उजवा कालवा या सर्व प्रकल्पामध्ये ३३ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे.

या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी व पाणी वापर संस्थांनी २८ जुलै रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आपले अर्ज नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावे व रीतसर पोहोच घ्यावी, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

यावर्षी धरणात जसजसा पाऊस पडून नवीन पाण्याचा साठा उपलब्ध होईल,त्याप्रमाणे शासन व वरिष्ठ कार्यालयाचा जो निर्णय होईल त्याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येईल. पाणी पुरवठा करताना पाऊस कमी झाल्यास किंवा धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास अथवा आपत्ती म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याची आवश्यकता भासल्यास अशावेळी दिलेले परवाने व मंजुरी रद्द करण्यात येईल.

याबाबत कोणतीही नुकसान भरपाई देण्यात येणार नाही अथवा त्याअनुषंगाने न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही, याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी,असे कळविण्यात आले आहे. उपलब्ध होणाऱ्या पाण्यात तेलबिया व चारा पिकास प्राधान्य असणार असून पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन मंजुरी देण्यात येईल.

तसेच प्रकल्पावर व कालव्यावर नमुना नं.७ नुसारचे मागणी पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात समप्रमाणात कपात करून मंजुरी देण्यात येईल. सहकारी पाणीवापर संस्थेच्या लाभक्षेत्रात नमुना नं.७ ची मंजुरी अनुज्ञेय राहणार नाही.ज्या शेतकऱ्यांना उपसा सिंचनाच्या कायम स्वरूपाच्या मंजुरीस मुदतवाढ  दिली आहे. त्यांनी नमुना नं.७चे पाणी अर्ज भरून मागणी करावी.

शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनावर भर द्यावा

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी वापर करताना सूक्ष्म सिंचनावर भर देण्यात यावा. उच्च न्यायालयात जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याबाबत ज्या जनहित याचिकाबाबतच्या निर्णयानुसार अथवा शासन निर्णयानुसार आवर्तन देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. याद्वारे फक्त खरिपाचे मागणीक्षेत्र मागविण्यात येत आहे. आवर्तन कालावधी अथवा कालव्यातून पाणी सोडण्याबाबत शासन अथवा वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर कालवा सोडण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey : ढोल-डफ वाजवित केले अधिकाऱ्यांचे स्वागत

Crop Loss Maharashtra : शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त, पण सरकारला पाझर फुटेना

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीसाठी हीच योग्य वेळ ः डॉ. नवले

Krushi Samruddhi Yojana : कृषी समृद्धीचा आराखडाच नाही

Dam Water Discharge : जायकवाडी धरणातून गोदावरीत सव्वादोन लाख क्युसेकने विसर्ग

SCROLL FOR NEXT