Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Rabi Sowing : लातूर विभागात केवळ २ लाख ४७ हजार हेक्टरवर पेरणी

Team Agrowon

Latur Dharashiv News : मराठवाड्यातील लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या पाचही जिल्ह्यांत २ लाख ४७ हजार ५२५ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ही पेरणी केवळ १८ टक्के इतकी आहे.

लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यातील २९२ मंडळांपैकी १८१ मंडळांत पावसाचे प्रदीर्घ खंड अनुभवले. ज्यामध्ये ११० मंडळांत १५ ते २१ दिवसांचे, तर ७१ मंडळांत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड राहिला. त्याचा थेट परिणाम खरिपाच्या पीक उत्पादनावर होताना दिसतो आहे.

सोयाबीनसारख्या महत्त्वाच्या पिकात ५० ते ६० टक्के पेक्षा जास्त उत्पादनात घट येते आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ७७ टक्के पाऊस लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत झाला. त्यात धाराशिव जिल्ह्यात ६६ टक्के, परभणीमध्ये ६२ टक्के, लातूरमध्ये ६८ टक्के, नांदेडमध्ये ९९ टक्के, तर हिंगोली जिल्ह्यात ८७ टक्के पाऊस झाला.

अपेक्षित पाऊस न झालेल्या भागात जमिनीत ओल टिकली नाही. त्याचा थेट परिणाम रब्बी पेरणीवर होताना दिसून येतो आहे. रब्बीतील सर्वसाधारण १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ४७ हजार ५२५ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली.

त्यामध्ये सर्वांत कमी पेरणी परभणी जिल्ह्यात केवळ ५.१४ टक्के, तर नांदेड जिल्ह्यात ८.१८ टक्के, हिंगोलीत १०.६७ टक्के, धाराशिवमध्ये १५.४४ टक्के, तर लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ४७.३९ टक्के क्षेत्रावर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पेरणी झाल्याची स्थिती आहे. पाचही जिल्ह्यांत पेरणी झालेली सर्व रब्बी पिके आताच्या घडीला उगवणीच्या अवस्थेत आहेत.

पीकनिहाय पेरणी स्थिती

रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५५,२३८ हेक्टरवरच ज्वारीची पेरणी झाली आहे.

गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६,९२७ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली.

हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६,१२४ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ७६ हजार ८७९ हेक्टर वरच हरभऱ्याची पेरणी झाली.

मकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७ हजार ९७१ हेक्टर असताना प्रत्यक्षात फक्त ६२७ हेक्टरवर मकाची पेरणी झाली.

करडईचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ६,२३६ हेक्टर क्षेत्रावरच करडईची पेरणी झाली.

जिल्हानिहाय रब्बी पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी

लातूर २ लाख ८० हजार ४३९ १ लाख ३२ हजार ८८५

धाराशिव ४ लाख ११ हजार १७२ ६३ हजार ४७१

नांदेड २ लाख २४ हजार ६३४ १८ हजार ३७२

परभणी २ लाख ७० हजार ७९४ १३ हजार ९२०

हिंगोली १ लाख ७६ हजार ८९१ १८ हजार ८७७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT