Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बीची केवळ १५ टक्केच पेरणी

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात खरिपाप्रमाणेच रब्बीतही धूळपेरणी करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. अपुऱ्या पावसावर झालेल्या ओलीवरच काही शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली आहे. मान्सून परतल्यावरही शेतकऱ्यांना पावसाची आस आहे. यंदाच्या मोसमात ज्वारीचे क्षेत्र घटणार आहे.

कर्जत-जामखेड हे तालुके ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जातात. तेथेही शेवटच्या टप्प्यातील पावसावरच शेतकऱ्यांनी तुरळक पेरा केला. खरिपात पाऊस पडेल या भरोशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. आताही तीच स्थिती आहे. परंतु परतीच्या मान्सूनचीही आशा मावळली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिणामी शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. तरीही आतापर्यंत ज्वारीची पेरणी ४४ हजार हेक्टर टक्के झाली. हे प्रमाण सरासरीच्या केवळ १६ टक्केच आहे. रब्बीसाठी ज्वारीचे २ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर ग्राह्य धरले जाते. गव्हासाठी ८६ हजार ४०४ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ १४ हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद आहे.

टक्केवारीत हे प्रमाण ०.०२ टक्के आहे. गव्हाच्या पेरणीसाठी अद्यपि अवकाश असल्याने हे प्रमाण नगण्य दिसते. ज्वारीची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंतच होते. त्यात आतापर्यंत केवळ १६ टक्के पेरणी झाल्याने आपसूक हे प्रमाण घटणार आहे. रब्बीत मक्याचीही पेरणी होते.

हरभऱ्यासह इतर कडधान्याची पेरणीही ९.८५ टक्के आहे. ती पेरणी ४५ हजार हेक्टरवर आहे. सूर्यफूल, जवस करडई, तिळाची पेरणी झाली आहे. रब्बीसाठी प्रशासनाने बियाण्यांची मागणी केली आहे. खतांचाही पुरवठा आहे. मात्र, मागणीच नसल्याचे ते पडून आहे. आज अखेर १५ टक्के एकूण पेरणी झाली असली, तरी गव्हाच्‍या पेरणीमुळे हा आकडा वाढू शकतो.

उपलब्ध खते

युरिया खरीप २५३७३ रब्बी मागणी ९८४४१ एकूण आवंटन ८००७०

एमओपी १५६७ ९८०२ ५०३०

एसएसपी १६८०२ ५९९५ ५४९५०

डीएपी १०७७४ १७१५३ १८७६०

संयुक्त खते ५७५४७ १०१२०३ १२३९२४

एकूण ११२०६३ २५२५९४ २८३७३३

बियाणाची मागणी (अनुक्रमे ज्वारी, गहू, हरभरा, मका)

सार्वजनिक ३७६३ ८७५० ९२४०७४०

खासगी १६१३ २५०० १२६०२९६०

एकूण ५३७५ ११०२५० १०५००३७००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT