Onion Nursery Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Nursery : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग

Onion Seedling Production : कांदा रोपवाटिका निर्मितीसाठी कांदा बियाण्याची खरेदी शेतकरी अजूनही काही भागात करीत आहेत. लागवड ऑगस्ट अखेरीस सुरू होईल, अशी स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग आला आहे. यंदा लागवड मात्र फारशी वाढणार नाही. पण कांदा रोपवाटिकांत रोपे तरारली असून, अनेक शेतकरी रोपे विक्रीचे नियोजन करीत आहेत. यंदा कांदा रोपवाटिका वाढल्याने रोपे मुबलक राहतील, असा अंदाज आहे.

कांदा रोपवाटिका निर्मितीसाठी कांदा बियाण्याची खरेदी शेतकरी अजूनही काही भागात करीत आहेत. लागवड ऑगस्ट अखेरीस सुरू होईल, अशी स्थिती आहे. लाल कांद्याची अधिक लागवड होईल. तर पांढरा कांदा पीक कमी राहील. यंदा धुळ्यात सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. तर जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन ते चार हजार हेक्टरवर आणि नंदुरबारात सुमारे दीड ते दोन हजार हेक्टरवर कांदा पीक राहील.

कांद्याचे दर एप्रिल ते मे या काळात कमी राहिले आहेत. गेल्या वर्षी खरिपातील किंवा नोव्हेंबरमध्ये काढणी झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १६०० रुपये कमाल दर मिळाला होता. तर किमान दर ६०० रुपये प्रतिक्विंटल, असा होता.

नंतर एप्रिल, मे व आता जून महिन्यातही उन्हाळ कांद्याला दर कमीच होता. सध्या किमान दर ८०० व कमाल दर १५०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्विंटल, असा मिळत आहे. कांद्याचे एकरी १२० क्विंटलवर उत्पादन काही शेतकऱ्यांनी घेतले आहे. आता दर स्थिर असल्याने अनेक जण कांदा लागवडीचे नियोजन करीत आहेत.

व्यावसायिक रोपवाटिका चोपडा भागात अधिक

रोपवाटिका निर्मिती काही जण व्यावसायिक स्वरूपात करीत आहेत. तर काही शेतकरी बियाणे खरेदी करून आपल्या पुढील लागवडीच्या नियोजनासंबंधी कांदा रोपवाटिका तयार करीत आहेत.

व्यावसायिक रोपवाटिका चोपड्यातील अडावद, धानोरा, माचले, लासूर, मराठे आदी गावांसह यावलमधील साकळी, किनगाव, शिरसाड, चुंचाळे, आडगाव, डांभुर्णी, धरणगावमधील पथराड, चोरगाव, भुलपाटे, टहाकळी, दोनगाव, एरंडोलमधील खर्ची, रवंजे, धुळ्यातील साक्री, शिंदखेडा, धुळे आदी भागात केल्या जात आहेत.

सुमारे २०० ते २१० हेक्टरवर या कांदा रोपवाटिका खानदेशात आहेत. यंदा रोपवाटिकादेखील अधिक आहेत. धुळ्यातही कांदा रोपवाटिका अधिक आहेत. धुळे तालुक्यातील लामकानी, कापडणे आदी भागात कांदा रोपवाटिका अधिक आहेत.

साक्री तालुक्यात सर्वाधिक चार ते साडेचार हजार हेक्टरवर खरिपातील कांदा पीक असते. या भागातही रोपवाटिका आहेत. पण कमी दर व अनेकदा पीक परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवड अधिकची न करण्याचेही नियोजन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सततच्या पावसाने ऊस पीक धोक्यात

Crop Damage Survey : सांगली जिल्ह्यातील दीड हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

Water Project Storage : सातपुड्यातील प्रकल्प भरू लागले

Bajari Sowing : खानदेशात बाजरी पीक जोमात

Crop Insurance : शेतकऱ्यांना मिळणार १२७ कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT